विशेष वर्गीकरण: Jurisprudence and Juristic Principles . Foods and Drinks . Forbidden Drinks .

عَنْ أَبِي بُرْدَةَ، عَنْ أَبِيهِ أَبِي مُوسَى الأَشْعَريِّ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ:
أَنَّ النَّبِيَّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ بَعَثَهُ إِلَى اليَمَنِ، فَسَأَلَهُ عَنْ أَشْرِبَةٍ تُصْنَعُ بِهَا، فَقَالَ: وَمَا هِيَ؟، قَالَ: «البِتْعُ وَالمِزْرُ»، فَقِيلَ لِأَبِي بُرْدَةَ: مَا البِتْعُ؟ قَالَ: نَبِيذُ العَسَلِ، وَالمِزْرُ: نَبِيذُ الشَّعِيرِ، فَقَالَ: «كُلُّ مُسْكِرٍ حَرَامٌ» خرجه البخاري. وَخَرَّجَهُ مُسْلِمٌ وَلَفْظُهُ: قَالَ: بَعَثَنِي رَسُولُ اَلله أَنَا وَمُعَاذٌ إِلَى اَليَمَنِ، فَقُلْتُ: يَا رَسُولُ اَللَّهِ! إِنَّ شَرَابًا يُصْنَعُ بِأَرْضِنَا يُقَال لَهُ: المِزَرُ مِنَ الشَّعِيرِ، وَشَرَابٌ يُقَالُ لَهُ: البِتْعُ مِنَ العَسَلِ، فَقَالَ: «كُلُّ مُسْكِرٍ حَرَامٌ». وَفِي رِوَايَةٍ لِمُسْلِمٍ: «فَقَالَ: كُلُّ مَا أَسْكَرَ عَنِ الصَّلَاةِ فَهُوَ حَرَامٌ». وَفِي رِوَايَةٍ لَهُ: «وَكَانَ رَسُولُ الله قَدْ أُعْطِيَ جَوَامِعَ الكَلِمِ بِخَوَاتِمِهِ، فَقَالَ: أَنْهَى عَنْ كُلِّ مُسْكِرٍ أَسْكَرَ عَنْ الصَّلَاةِ».

[صحيح] - [رواه البخاري ومسلم] - [الأربعون النووية: 46]
المزيــد ...

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

अबु बुरदा आपले वडिल अबु मुसा अशअरी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की:
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर त्यांना यमन कडे रवाना केले, तेव्हा प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर त्या प्रदेशात बनणाऱ्या पेया बाबत सवाल केला, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर विचारले की ते पेय कोणते आहेत? अबु मुसा अशअरी रजिअल्लाहु अनहु म्हणाले की:<<बितउ व मिजर>>, मग कुणी अबु बरदा ला विचारले:बितउ काय आहे? ते म्हणाले:मधा द्वारा बनविण्यात आलेला नबिज, आणी मिजर:जे शय्यीर [जौ] द्वारा बनविण्यात येतो, त्यावर प्रेषित सलामती असो त्यांच्यावर म्हणाले:<<प्रत्येक मादक पदार्थ हराम आहे>>बुखारी मधे नमुद आहे. तसेच मुस्लीम ने सुद्धा वर्णन केले आहे, फक्त शब्दाचा फेरबदल खालीलप्रमाणे आहे: हजरत अबु मुसा अशअरी सांगतात की:प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर मला व मुआज ला यमन कडे पाठविले, त्यावर मी प्रश्न केला की:हे प्रेषिता! आमच्या प्रदेशात एक पदार्थ बनविला जातो जो जौ द्वारे बनविला जातो, त्याला मिज्जर म्हणतात, व दुसऱ्याला बितउ जो मधा द्वारा बनविला जातो, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की: <<प्रत्येक मादक पदार्थ हराम आहे>>. अन्य मुस्लीम च्या कथनामधे आहे की: <<प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:ज्या वस्तुच्या नशेमुळे, मनुष्य नमाज पासुन अनभिज्ञ राहतो, ती वस्तु हराम आहे>>. अन्य एका हदिस मधे आहे की:<<प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर व्यापक वाणी प्रदान करण्यात आली होती, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की:मी त्या प्रत्येक नशा युक्त पदार्था पासुन तुम्हाला मना करतो, जे तुम्हाला नमाज पासुन गाफील करतात>>.

[صحيح] - [رواه البخاري ومسلم] - [الأربعون النووية - 46]

स्पष्टीकरण

हजरत अबु मुसा अशअरी रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर त्यांना यमन कडे रवाना केले असता, त्यांनी तिथे बनविले जाणारे पदार्था विषयी प्रश्न विचारला, काय ते पदार्थ वैध आहेत कि अवैध? प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर त्या पदार्थां विषयी सविस्तर माहिती विचारली. त्यांना सांगण्यात आले की:बितउ मधा पासुन बनवितात, मिजर जौ पासुन बनविलेले पेय आहे. त्यावर प्रेषितांनी एका वाक्यात सांगितले की:<<प्रत्येक मादक पदार्थ हराम आहे>>.

हदिसचे फायदे

  1. नबिज: ते शरबत आहे, जे खजुर, मध व जौ द्वारा बनविण्यात येतो, गोड चवदार पदार्थ बनतो परंतु जर ते [आंबवले]तापवले तर नशा युक्त बनते.
  2. सदर हदिस प्रत्येक नशा करणाऱ्या पदार्थाला अवैध असण्याची मजबुत प्रमाण आहे, जसे दारु,चरस, हिरोईन वगैरे.
  3. मुस्लीमांनी आवश्यक खाद्यां बाबत प्रश्न करणे जरुरी आहे.
  4. सुरुवातीला दारु पिऊन नमाज अदा करणे मना करण्यात आले होते, कारण काही मुहाजीर नशेमध्ये नमाज पठण करतांना चुक केली होती; त्यावर कुरआन ची स्पष्टोक्ती आली:{हे ईमान ठेवणाऱ्यांनो! तुम्ही नशेत असताना नमाज जवळ जाऊ नका, जोपर्यंत तुम्हाला तुम्ही काय बोलत आहात हे समजत नाही} [निसा: ४३].आणि अल्लाहच्या रसूलचा पुकार करणारा घोषणा करत असे: नशेत असलेला कोणीही नमाज जवळ येऊ नये. त्यानंतर साक्षात अल्लाह ने शराब दारु ला स्पष्टपणे हराम करण्यात आले:{दारु,जुआ, मुर्ती व आस्थाने हे सर्व शैतानी क्रुत्य आहे, बस्स तुम्ही यापासुन दुर राहा जेणेकरून तुम्ही यशस्वी व्हाल ९० शैतान दारू आणि जुगाराच्या माध्यमातून तुमच्यामध्ये वैर आणि द्वेष निर्माण करू इच्छितो, आणि तुम्हाला अल्लाहच्या स्मरणापासून व नमाज पासून दूर ठेवू पाहतो, तर मग तुम्ही थांबणार आहात का} [मायदा: ९०,९१].
  5. सर्वोच्च अल्लाह ने दारु हराम केली, कारण त्यापासुन फार मोठे नुकसान,मानवतेविरुद्ध द्रोह आहे.
  6. हराम चे मुळ कारण नशा आहे, जर नबिज नशा युक्त असेल तर ती हराम आहे, व जर नशा मुक्त असेल तर हराम नाही.
भाषांतरे दाखवा
भाषा: الإنجليزية الأوردية الإسبانية अधिक (56)