عَنْ أَبِي مُحَمَّدٍ عَبْدِ اللَّهِ بْنِ عَمْرِو بْنِ العَاصِ رَضِيَ اللَّهُ عَنْهُمَا، قَالَ: قَالَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«لَا يُؤْمِنُ أَحَدُكُمْ حَتَّى يَكُونَ هَوَاهُ تَبَعًا لِمَا جِئْتُ بِهِ».

[قال النووي: حديث صحيح] - [رويناه في كتاب الحجة بإسناد صحيح] - [الأربعون النووية: 41]
المزيــد ...

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

अबु मुहम्मद अब्दुल्लाह बिन अम्र बिन आस अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की: प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:
<<तुमच्यापैकी कोणतीही व्यक्ती तोपर्यंत परिपुर्ण [श्रद्धावान] ईमानधारक होऊ शकत नाही, जोपर्यंत त्याची इच्छा आकांक्षा माझ्या शरीयत च्या अधिन होत नाही>>.

[قال النووي: حديث صحيح] - [رويناه في كتاب الحجة بإسناد صحيح] - [الأربعون النووية - 41]

स्पष्टीकरण

प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर सविस्तर वर्णन केले आहे की मनुष्य तोपर्यंत परिपुर्ण ईमान प्राप्त करु शकत नाही, जोपर्यंत त्याची आवड, ईच्छा आकांक्षा, व निवड सुद्धा प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर मार्गदर्शना नुसार असावी, अर्थात प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर दिलेला आदेश त्याला अतिप्रिय व्हावा, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर जे मना केले त्याला अप्रिय असावे.

हदिसचे फायदे

  1. हा हदीस शरियतला पूर्णपणे मान्य करणे आणि तिचे पालन करणे या बाबतीत एक मूलभूत तत्त्व आहे.
  2. सदर हदिस मधे धमकी वजा ईशारा देण्यात आला आहे की,जी व्यक्ती आपली बुद्धी , ईच्छा व सामाजीक प्रश्न धर्मानुसार न सोडवता आपल्या मनमर्जीला प्राधान्य देत असेल तर अशा व्यक्तिं मधे ईमान नसण्याचे संकेत आहेत.
  3. जिवनातील प्रत्येक विषयात शरीयत ला निर्णायक बनविने अत्यावश्यक आहे, या विधानावरून:<<मी जे घेऊन आलो आहे त्यानुसार>>.
  4. यावरुन सिद्ध होते की आज्ञापालनामुळे ईमान मध्ये वाढ होते, व पापांमुळे ईमान घटते.
भाषांतरे दाखवा
भाषा: الإنجليزية الأوردية الإسبانية अधिक (56)
अधिक