عَنْ أَبِي هُرَيْرَة رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ: قَالَ رَسُول اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«إنَّ اللَّهَ تَعَالَى قَالَ: مَنْ عَادَى لِي وَلِيًّا فَقْد آذَنْتُهُ بِالحَرْبِ، وَمَا تَقَرَّبَ إلَيَّ عَبْدِي بِشَيْءٍ أَحَبَّ إلَيَّ مِمَّا افْتَرَضْتُ عَلَيْهِ، وما يَزَالُ عَبْدِي يَتَقَرَّبُ إلَيَّ بِالنَّوَافِلِ حَتَّى أُحِبَّهُ، فَإِذَا أَحْبَبْتُهُ كُنْتُ سَمْعَهُ الَّذِي يَسْمَعُ بِهِ، وَبَصَرَهُ الَّذِي يُبْصِرُ بِهِ، وَيَدَهُ الَّتِي يَبْطِشُ بِهَا، وَرِجْلَهُ الَّتِي يَمْشِي بِهَا، وَإِنْ سَأَلَنِي لَأُعْطِيَنَّهُ، وَلَئِنْ اسْتَعَاذَنِي لَأُعِيذَنَّهُ».
[صحيح] - [رواه البخاري] - [الأربعون النووية: 38]
المزيــد ...
अबुहुरैरा अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की:प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:
<< अल्लाह तआला ने फरमाविले आहे की:ज्या व्यक्ती ने माझ्या [वलि] दोस्ताशी दुश्मनी केली, माझी त्याच्या बरोबर खुल्या युद्धाची घोषणा आहे, माझ्या कडे मी अनिवार्य केलेल्या भक्ति पेक्षा अन्य कोणतेही सत्कर्म मला प्रिय नाहीत, ज्याद्वारे माझा दास माझी जवळीक साधतो, ऐच्छीक (नफिल) भक्ति अदा करुन, माझा दास माझ्या अजुन जवळीकता साधतो, इथपर्यंत की मी त्या दासाशी प्रेम करु लागतो, जेव्हा मी त्यावर प्रेम करु लागतो, तेंव्हा मी त्याचा कान बनतो ज्याद्वारे तो ऐकतो,त्याचा डोळा बनतो ज्याने तो बघतो, त्याचा हात बनतो ज्याने तो पकडतो, त्याचे पाय बनतो ज्याने तो चालतो, जर तो मला काही मागतो तर मी त्याला जरुर प्रदान करतो, जर तो माझा आश्रय मागतो तर मी त्याला आश्रय देतो>>.
[صحيح] - [رواه البخاري] - [الأربعون النووية - 38]
सदर हदिस हदिस ए कुदसी मध्ये प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर कथन केले आहे की साक्षात अल्लाह ने फरमाविले आहे की:ज्याने माझ्या दोस्ताला ईजा दिली, त्याला नाराज केले, किंवा त्याचा द्वेष केला, तर मी स्वतः त्याच्याविरुद्ध दुश्मनी ची घोषणा केली. आणी वली दोस्त आहे: (मोमीन) श्रद्धावान व (परहेजगार) ईशभिरुता बाळगणारा, दासांजवळ जितका जास्त (ईमान) विश्वास व (तक्वा) ईशभय असेल, तेवढी जास्त त्याची अल्लाह शी दोस्तीचा वाटा असेल. मुसलमान श्रद्धावान आपल्या पालनकर्त्याच्या जवळ अन्य कोणत्याच सत्कर्माद्वारे होत नाही, जेवढा तो अल्लाह च्या अनिवार्य भक्ति जे अल्लाह ला अत्यंत प्रिय आहे, ज्याचा सर्वोच्च अल्लाह ने हुकुम दिला आहे, म्हणजे (वाजिब) अत्यावश्यक उपासना अदा करणे, व त्याने हराम व मना केलेल्या कामा पासुन दुर राहणे, मग दास अनिवार्य उपासने सोबत ऐच्छीक उपासनेद्वारे अजुन अल्लाहच्या जवळ जात असतो; ईथपावेतो की साक्षात अल्लाह चे प्रेम प्राप्त करुन घेतो, मग जेव्हा अल्लाह प्रिय दासांवर प्रेम करु लागतो तेंव्हा दासाच्या चार अवयवांची सुरक्षा व मार्गदर्शन करतो: त्याच्या कानाचे रक्षण करतो, अर्थात तो तिच गोष्ट ऐकतो जि अल्लाह ला प्रसन्न करते. त्याच्या डोळ्याचे रक्षण करतो, तो फक्त तेवढेच बघतो जे अल्लाह ला पसंद आहे. त्याच्या हाताचे रक्षण करतो, तो आपल्या हाताने तेच क्रुत्य करतो, ज्यामुळे अल्लाह प्रसन्न होतो. त्याच्या पायाचे रक्षण करतो, तो फक्त त्याच दिशेने चालतो ज्यावर चालल्याने अल्लाह राजी़ होतो, तो फक्त भलाई च्या दिशेकडेच चालत राहतो. आणी त्यासोबतच जर त्याने अल्लाहकडे काही याचना केली तर अल्लाह त्याची मागणी पुर्ण करतो, त्याची दुआ सुद्धा अल्लाह ऐकतो, जर एखाद्या संकटातुन सुटके करता, जर तो अल्लाह कडे आश्रय मागतो तर अल्लाह त्याला जरुर आश्रय देतो, त्याची संपूर्णपणे मदत करतो, त्या दासाला उच्च स्थानाकडे मार्गदर्शन सुद्धा करतो.