عَنْ أَبِي هُرَيْرَةَ عَبْدِ الرَّحْمَنِ بْنِ صَخْرٍ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ: سَمِعْت رَسُولَ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّم يَقُولُ:
«مَا نَهَيْتُكُمْ عَنْهُ فَاجْتَنِبُوهُ، وَمَا أَمَرْتُكُمْ بِهِ فَافْعَلُوا مِنْهُ مَا اسْتَطَعْتُمْ، فَإِنَّمَا أَهْلَكَ الَّذِينَ مِنْ قَبْلِكُمْ كَثْرَةُ مَسَائِلِهِمْ، وَاخْتِلَافُهُمْ عَلَى أَنْبِيَائِهِمْ».
[صحيح] - [رواه البخاري ومسلم] - [الأربعون النووية: 9]
المزيــد ...
हजरत अबु हुरैरा अबदुर्हमान बिन सखर रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर फरमावितांना ऐकले की:
<<मी तुम्हाला ज्या गोष्टी पासुन रोकतो, तुम्ही जरुर त्या गोष्टींपासुन सावध राहा आणी ज्याचा आदेश देतो, त्यावर ऐपतीनुसार आचरण करा, तुमच्या पुर्वज याच कारणामुळे नष्ट झाले, कारण ते आपल्या पैगंबरांवरच प्रश्नांचे भडिमार करत होते, व त्या पैगंबरांची अवहेलना व आपसात मतभेद करत होते>>.
[صحيح] - [رواه البخاري ومسلم] - [الأربعون النووية - 9]
अल्लाह च्या अंतिम प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर स्पष्टपणे सांगितले आहे की, ज्या गोष्टी पासुन तुम्हाला मना करण्यात आले आहे, त्यापासुन पुर्णपणे दुर राहणे अत्यावश्यक आहे, त्यात कसलीही सवलत नाही, आणी जर तुम्हाला पैगंबरांनी आदेश दिला तर तुमच्या शक्तीनुसार त्यावर अंमलबजावणी करणे जरुरी आहे. प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आम्हाला स्पष्टपणे ईशारा दिला, आम्ही मागील उम्मता [समुहा] प्रमाणे घोडचुक करु नये, ज्यांनी आपल्या पैगंबरांना विविध प्रश्नोत्तरांनी व त्यांची अवज्ञा करुन अपमानीत केले, त्यामुळे सर्वोच्च अल्लाह ने त्या लोकांना विविध प्रकारच्या संकटानी व प्रकोपांनी घेरले, म्हणुन आम्ही त्या लोकांसारखे आचरण करु नये, अन्यथा आमच्यावर सुद्धा तोच प्रकोप व राग ओढवु शकतो.