عَنْ أَبِي رُقَيَّةَ تَمِيمِ بْنِ أَوْسٍ الدَّارِيِّ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ أَنَّ النَّبِيَّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«الدِّينُ النَّصِيحَةُ» قُلْنَا: لِمَنْ؟ قَالَ: «لِلهِ وَلِكِتَابِهِ وَلِرَسُولِهِ وَلِأَئِمَّةِ الْمُسْلِمِينَ وَعَامَّتِهِمْ».
[صحيح] - [رواه مسلم] - [الأربعون النووية: 7]
المزيــد ...
हजरत अबू रुकय्या तमीम बिन औस अद-दारि रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:
“धर्म हा सल्ला आहे” आम्ही म्हणालो: कोणाला? तो म्हणाला: अल्लाहसाठी, त्याच्या पुस्तकासाठी, त्याच्या दूतासाठी, मुस्लिमांच्या इमामांसाठी आणि त्यांच्या सामान्य लोकांसाठी.
[صحيح] - [رواه مسلم] - [الأربعون النووية - 7]
प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर संदेश देतात कि ईस्लाम ची मुलभूत शीकवण,प्रत्येक कर्म केवळ आणी केवळ एकमेव अल्लाह च्या रजेकरता व सत्यावरच आधारित आहे, प्रत्येक सत्कर्म फक्त आणी फक्त अल्लाह च्या आदेशानुसार अदा करावे, संपुर्ण पणे व कोणतीच कमी व चुक न करता अदा करावे. प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर विचारण्यात आले की: संदेश कुणा बाबत असते? त्यावर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले: पहिला:संदेश सर्वोच्च अल्लाह बाबत: कोणतेही सत्कर्म फक्त आणी फक्त एकमेव अल्लाह ची मर्जी संपादना करताच असावे, त्याच्या समान कुणालाच भागीदार करु नये, तोच एकमेव अल्लाह आहे, जो समस्त जगाचा खरा मालक व पुजनीय सुद्धा तोच आहे, तसेच त्याची सुंदर नामे व गुणविशेष आहेत, त्यावर ठाम विश्वास ठेवावा, अल्लाह च्या आदेशाचे आदर व पालन करावे, समस्त मानवजातीला एकमेव अल्लाह च्या दिव्य संदेशाकडे बोलवावे. दुसरे:त्याच्या दिव्य ग्रंथा बाबत संदेश कुरआन बाबत: हा ठाम विश्वास बाळगावा कि, कुरआन साक्षात अल्लाह ची वाणी आहे, तसेच अल्लाह कडुन आलेला अंतिम ग्रंथ आहे, कुरआन आपल्या पुर्वीच्या शरीयतला [ईश्वरीय संदेशांना]बाद ठरवतो, कुरआन चा आदर करावा, त्याचे न चुकता पठण करावे, त्याच्या स्पष्ट आदेशांवर अंमलबजावणी करावी, अस्पष्ट आदेशावर विश्वास ठेवावा, कुरआन वर शंका उपस्थित करणाऱ्या विरुद्ध कुरआन चे पुर्णतः समर्थन करावे, कुरआन च्या संदेशावर ध्यान धरावे, त्याच्या धड्या पासुन बोध घ्यावा, त्याच्या ज्ञानाचा प्रसार व प्रचार करावा, जणमानसाचे लक्ष्य त्याच्या संदेशाकडे वेधावे. तिसरे:अल्लाह च्या प्रेषिता सलामती असो त्यांच्यावर बाबत संदेश: हा ठाम विश्वास बाळगावा कि मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर अल्लाह चे अंतिम व शेवटचे प्रेषित आहेत, जो दिव्य संदेश त्यांनी समस्त जगाला दिला त्याची पुष्टी करावी, त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, त्यांनी मना केलेल्या कामा पासुन दुर राहावे, अल्लाहची उपासना प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर केलेल्या पद्धतीनेच करावी, प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर त्यांचा आदर व पैगंबरांचा सलामती असो त्यांच्यावर मनापासुन स्वीकार करावा, त्यांच्या धर्माचा प्रसार व प्रचार करावा, त्यांच्यावर झालेल्या सर्वच खोट्या आरोपांचे खंडण करावे. चौथा:मुस्लीमांच्या शासकां बाबत संदेश: सत्याच्या प्रचार व प्रसार मध्ये त्याचे हात बळकट करावे, त्याच्यासोबत भांडणतंटा करु नये, सत्कर्म करतांना, शरीयत च्या चौकटीत राहून त्यांचे अनुसरण करावे. पाचवा:आम मुसलमाना करता संदेश: आम मुस्लीमांची काळजी घ्यावी, त्यांच्यावर उपकार व त्यांची भलाई ईच्छावी, त्यांना सत्याकडे आमंत्रित करावे, त्याना नाहक त्रास देऊ नये, सत्कर्मा मधे व ईशभिरुतेच्या कार्यात एकमेकांची मदत करावी.