عَنْ أَبِي مُوسَى رضي الله عنه عَنِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«إِنَّ اللهَ عَزَّ وَجَلَّ يَبْسُطُ يَدَهُ بِاللَّيْلِ لِيَتُوبَ مُسِيءُ النَّهَارِ، وَيَبْسُطُ يَدَهُ بِالنَّهَارِ لِيَتُوبَ مُسِيءُ اللَّيْلِ، حَتَّى تَطْلُعَ الشَّمْسُ مِنْ مَغْرِبِهَا».
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 2759]
المزيــد ...
अबू मुसा कडून असे वर्णन केले गेले की अल्लाहचे पैगंबर म्हणाले:
"अल्लाह रात्रीच्या वेळी आपला हात पसरवतो, जेणेकरून दिवसाचा पापी पश्चात्ताप करतो, आणि दिवसा आपला हात पसरतो, जेणेकरून रात्रीचा पापी पश्चात्ताप करतो, जोपर्यंत सूर्य पश्चिमेकडून उगवतो."
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 2759]
अल्लाहचे प्रेषित (शांति आणि आशीर्वाद) हे सांगत आहेत की अल्लाह आपल्या सेवकाचा पश्चात्ताप स्वीकारतो. जेव्हा एखादी व्यक्ती दिवसा पाप केल्यानंतर रात्री पश्चात्ताप करते तेव्हा अल्लाह त्याचा पश्चात्ताप स्वीकारतो. तसेच रात्री पाप केल्यानंतर दिवसा पश्चात्ताप केल्यावर त्याचा पश्चात्ताप स्वीकारला जातो. पश्चात्तापाच्या आनंदात आणि ते स्वीकारण्यासाठी अल्लाह आपला हात पुढे करतो, जगाचा अंत करण्यासाठी सूर्य पश्चिमेला उगवण्यापर्यंत पश्चात्तापाचे दरवाजे खुले राहतील, जेव्हा सूर्य पश्चिमेकडून उगवेल तेव्हा पश्चात्तापाचे दार बंद होईल.