عَنْ أَبِي ثَعْلَبَةَ الخُشَنِيِّ جُرْثُومِ بن نَاشِرٍ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ عَنْ رَسُولِ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَال:
«إِنَّ اللَّهَ فَرَضَ فَرَائِضَ فَلَا تُضَيِّعُوهَا، وَحَدَّ حُدُودًا فَلَا تَعْتَدُوهَا، وَحَرَّمَ أَشْيَاءَ فَلَا تَنْتَهِكُوهَا، وَسَكَتَ عَنْ أَشْيَاءَ رَحْمَةً لَكُمْ غَيْرَ نِسْيَانٍ فَلَا تَبْحَثُوا عَنْهَا».
[قال النووي: حديث حسن] - [رواه الدارقطني في سننه، وغيره] - [الأربعون النووية: 30]
المزيــد ...
हजरत अबु साअलबा खुशनी जुरसुम बिन नाशीर अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:
<<निश्चितच सर्वोच्च अल्लाह ने काही अत्यावश्यक कर्तव्ये निश्चित केली आहेत, तुम्ही त्यांचा अनादर करु नका, काही मर्यादा निश्चित केल्या आहेत, त्यांचे उल्लंघन कदापी करु नका, काही गोष्टी हराम केल्या आहेत, तुम्ही त्या हराम गोष्टींना वैध करु नका, काही गोष्टीबाबत अल्लाह ने मौन बाळगले आहे, तुमच्यावर दया म्हणुन विसरुन नव्हे, म्हणुन तुम्ही त्याबद्दल विनाकारण प्रश्न विचारु नका>>.
[قال النووي: حديث حسن] - [رواه الدارقطني في سننه وغيره] - [الأربعون النووية - 30]
प्रेषित सलामती असो त्यांच्यावर संदेश स्पष्ट करतात की, सर्वोच्च अल्लाह ने काहि कर्मांना आपल्या दासांवर अनिवार्य केले आहे, म्हणुन त्यावर तुम्ही आचरण करा, त्या कर्मांना वगळुन किंवा त्यामध्ये टाळमटोळ करण्याची घोडचुक करु नका, साक्षात अल्लाह ने काही मर्यादा स्पष्ट केल्या आहेत, त्या दासांना अनावश्यक बाबी पासुन दुर ठेवण्यासाठी व वाचवण्यासाठी आहेत, म्हणुन त्या मर्यादा चे उल्लंघन करु नका, सर्वोच्च अल्लाह ने काही क्रुत्य हराम केले आहे, अशा क्रुत्यांच्या जवळपास सुद्धा फिरकु नका, आणी ज्या बाबीं या सर्वां व्यतिरिक्त आहेत, व त्याबाबत अल्लाह ने मौन धारण केले आहे, ते तुम्हावर रहम व क्रुपा म्हणुन आहे, अनावधानाने किंवा विसरल्या मुळे नाही, म्हणुन तुम्ही त्या बाबीं बद्दल विनाकारण प्रश्न करु नका, तशा बाबीं आपल्या वास्तविक अवस्थेत हलाल म्हणजे वैध असतात.