عَنِ ابْنِ عَبَّاسٍ رَضِيَ اللَّهُ عَنْهُمَا عَنِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«أَلْحِقُوا الفَرَائِضَ بِأَهْلِهَا، فَمَا بَقِيَ فَلِأَوْلَى رَجُلٍ ذَكَرٍ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 6737]
المزيــد ...
इब्न अब्बास अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले:
<<फरायज (निर्धारित हिस्से) त्यांच्या हक्कदारांना देऊ द्या, आणि जो काही उरतो तो सर्वात जवळच्या पुरुष नातलगाला दिला जाईल>>.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 6737]
प्रेषित सलामती असो त्यांच्यावर तऱकेची (वारसाहातील मालमत्तेची) विभागणी करणाऱ्यांना आदेश देतात की त्यांनी अल्लाह तआलाने निर्धारित केलेल्या शरई आणि न्यायपूर्ण पद्धतीने वारसा विभागावर, सर्वप्रथम त्या वारसांना त्यांचा निश्चित हिस्सा दिला जावा ज्याचे प्रमाण कुरआनमध्ये नमूद आहे, जसे: दोन तृतिया, एक तृतिया, एक सहावा, अर्धा, चौथाई आणि आठवा हिस्सा, या हिस्स्यांची पूर्तता केल्यानंतर जर काही माल उरला तर तो मृत व्यक्तीच्या सर्वात जवळच्या पुरुष नातलगाला दिला जाईल, ज्यांना अस्बाह म्हणतात.