عَنْ عَائِشَةَ رضي الله عنها قَالَتْ:
كَانَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَسْتَحِبُّ الْجَوَامِعَ مِنَ الدُّعَاءِ، وَيَدَعُ مَا سِوَى ذَلِكَ.
[صحيح] - [رواه أبو داود وأحمد] - [سنن أبي داود: 1482]
المزيــد ...
आयशा (अल्लाह तिच्यावर प्रसन्न असो) यांनी सांगितले:
अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांना व्यापक प्रार्थना आवडत असत आणि इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवत असत.
[صحيح] - [رواه أبو داود وأحمد] - [سنن أبي داود - 1482]
पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांना अशा प्रार्थना आवडत असत ज्यात या जगाचे आणि परलोकाचे भले असेल, कमी शब्दात पण खोल अर्थ असतील, ज्यामध्ये अल्लाहची स्तुती आणि उदात्त हेतू असतील, आणि ते इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवत असत.