عَنْ ابْنِ عَبَّاسٍ رَضِيَ اللَّهُ عَنْهُمَا أَنَّ رَسُولَ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«إنَّ اللَّهَ تَجَاوَزَ لِي عَنْ أُمَّتِي الخَطَأَ وَالنِّسْيَانَ وَمَا اسْتُكْرِهُوا عَلَيْهِ».
[قال النووي: حديث حسن] - [رواه ابن ماجه والبيهقي وغيرهما] - [الأربعون النووية: 39]
المزيــد ...
अब्दुल्ला बिन अब्बास अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की प्रेषितांनी [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] फरमाविले आहे की:
<<निःसंकोच सर्वोच्च अल्लाह ने माझ्या
उम्मत च्या चुका,भुलचुका,आणी ते क्रुत्य,जे करण्यास भाग पाडले जात असेल, ते सर्व माफ केले आहेत>>.
[قال النووي: حديث حسن] - [رواه ابن ماجه والبيهقي وغيرهما] - [الأربعون النووية - 39]
प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर खबर देत आहेत की:अल्लाह ने आपल्या उम्मत च्या तिन प्रकारच्या चुका माफ केल्या आहेत: पहिला:चुका, असे कॖत्य जे विना ईराद्याचे व विना प्रयत्नाचे घडले असावे, ईमानधारक आपल्या शुद्ध हेतुने काही सत्कर्म करण्याची ईच्छा ठेवत असेल परंतु, अनावधानाने भलतच घडावे. दुसरा:भुलचुका, [नसीयान] सत्कर्म करण्याची मनोमनी तिव्र ईच्छा सुद्धा असतांना परंतु ऐनवेळी विसर पडावा, अशा परिस्थितीत ते क्रुत्य पाप होत नाही. तिसरा:बळजबरी एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्रुत्यावर मजबुर केले जावे, आणी ते क्रुत्य करण्याची त्याची कोणतीही इच्छा नसेल, परंतु परिस्थिती अशी असेल की ते क्रुत्य टाळताही येत नसेल, अशा वेळी त्या व्यक्ती वर कोणतेही पाप नाही. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, सदर हदिस फक्त अल्लाह आणी बंदा [दासा] दरम्यान आहे, म्हणजे अनावश्यक व हराम क्रुत्य चुकभुलीने किंवा बळजबरीने घडणे, अनिवार्य सत्कर्मांना [जसे नमाज अदा करणे विसरून जाणे] विसरणे,तर तसे सत्कर्म माफ होत नाही,तर त्याचा हुकुम बाकी राहतो, नंतर अदा करणे जरुरी आहे, जर एखाद्या व्यक्तीच्या क्रुत्याने दुसऱ्या मनुष्याचे नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई करणे जरुरी आहे, जसे चुकीने खुन झाला तर त्याची दैत [भरपाई] अदा करणे आवश्यक आहे, किवा दुसऱ्याची गाडी चे नुकसान झाले तर त्याची भरपाई द्यावी लागेल.