عَنْ وَحْشِيِّ بْنِ حَرْبٍ رَضيَ اللهُ عنه:
أَنَّهُمْ قَالُوا: يَا رَسُولَ اللَّهِ، إِنَّا نَأْكُلُ وَلَا نَشْبَعُ، قَالَ: «فَلَعَلَّكُمْ تَأْكُلُونَ مُتَفَرِّقِينَ؟» قَالُوا: نَعَمْ. قَالَ: «فَاجْتَمِعُوا عَلَى طَعَامِكُمْ، وَاذْكُرُوا اسْمَ اللَّهِ عَلَيْهِ، يُبَارَكْ لَكُمْ فِيهِ».
[حسن] - [رواه أبو داود وابن ماجه وأحمد] - [سنن ابن ماجه: 3764]
المزيــد ...
वशी बिन हरब (रह.) यांचे कथन:
त्यांनी विचारले: हे अल्लाहचे रसूल! आम्ही अन्न खातो पण तृप्त होत नाही. त्यांनी (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) विचारले: कदाचित तुम्ही अन्न वेगळे खाता? त्यांनी उत्तर दिले: हो. त्यांनी (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) सांगितले: तुमचे अन्न गोळा करा आणि ते खा आणि त्यावर अल्लाहचे नाव घ्या, ते तुमच्यासाठी बरकत असेल.
[حسن] - [رواه أبو داود وابن ماجه وأحمد] - [سنن ابن ماجه - 3764]
काही सोबत्यांनी पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांना प्रश्न विचारला आणि म्हणाले: आपण अन्न खातो पण आपल्याला समाधान होत नाही.
म्हणून पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) त्याला म्हणाले: कदाचित तुम्ही जेवणाच्या वेळी वेगळे बसता, म्हणून सगळे एकटेच जेवतात? तो म्हणाला: हो. तो (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) म्हणाला: एकत्र जेवा, वेगळे जेवू नका आणि जेवताना अल्लाहचे नाव घ्या आणि "बिस्मिल्लाह" म्हणा जेणेकरून तुमच्यासाठी त्यात आशीर्वाद असेल आणि तुम्हाला समाधान मिळेल.