عَنْ جَابِرٍ رضي الله عنه قَالَ: سَمِعْتُ النَّبِيَّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَقُولُ:
«إِنَّ الشَّيْطَانَ قَدْ أَيِسَ أَنْ يَعْبُدَهُ الْمُصَلُّونَ فِي جَزِيرَةِ الْعَرَبِ، وَلَكِنْ فِي التَّحْرِيشِ بَيْنَهُمْ».
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 2812]
المزيــد ...
जाबीर (अल्लाह त्याच्यावर प्रसन्न असो) यांनी सांगितले: मी पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांना असे म्हणताना ऐकले:
"खरंच, अरबी द्वीपकल्पात प्रार्थना करणाऱ्यांकडून त्याची उपासना होण्याची आशा सैतानाने गमावली आहे, परंतु त्यांच्यात मतभेद पेरण्याची आशा त्याने सोडलेली नाही."
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 2812]
प्रेषित (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी सांगितले की अरब द्वीपकल्पात प्रार्थना करणारे श्रद्धावान त्याची पूजा करण्यास आणि मूर्तींना नतमस्तक होण्यास परत येतील याची सैतानाला आशा राहिली नाही, तथापि, तो अजूनही वाद, शत्रुत्व, युद्धे, कलह इत्यादी भडकवून त्यांच्यामध्ये मतभेद पेरण्याची इच्छा बाळगतो आणि अजूनही प्रयत्न करत आहे.