عَنْ هِشَامِ بْنِ حَكِيمِ بْنِ حِزَامٍ رَضيَ اللهُ عنهما أَنَّهُ مَرَّ عَلَى أُنَاسٍ مِنَ الْأَنْبَاطِ بِالشَّامِ، قَدْ أُقِيمُوا فِي الشَّمْسِ، فَقَالَ: مَا شَأْنُهُمْ؟ قَالُوا: حُبِسُوا فِي الْجِزْيَةِ، فَقَالَ هِشَامٌ: أَشْهَدُ لَسَمِعْتُ رَسُولَ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَقُولُ:
«إِنَّ اللهَ يُعَذِّبُ الَّذِينَ يُعَذِّبُونَ النَّاسَ فِي الدُّنْيَا».
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 2613]
المزيــد ...
हजरत हिश्शाम बिन हकिम बिन हिजाम अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की श्याम मध्ये काही अजमी शेतकऱ्यां जवळुन गेलो असता, त्यांना उन्हात उभे करण्यात आले होते, त्यांनी विचारले:या लोकांना काय झाले?
लोकांनी सांगितले की: यांनी जिझीया न भरल्यामुळे हि सजा देण्यात आली आहे,
हिश्शाम अल्लाह राजी असो त्यांच्यावर नि फरमाविले की:मी ग्वाही देतो की मी स्वतः प्रेषितांना अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर स्पष्ट सांगताना ऐकले:
<<अल्लाह तआला त्या लोकांना जरुर यातना देईल जे या जगात ईतरांना त्रास देतात>>.
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 2613]
हजरत हिश्शाम बिन हकिम बिन हिजाम अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर त्यांनी श्याम मध्ये काहि शेतकऱ्यांना रस्त्यावर बघितले, ज्यांना उन्हात उभे राहण्याची सजा देण्यात येत होती, विचारल्यावर? सांगण्यात आले की, हे लोकं जिझीया भरत नाहीत, मात्र ते भरु शकतात. त्यावर पैगंबरांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम सोबत्याने प्रतिक्रिया देतांना म्हटले की:मी प्रेषितांकडुन सलामती असो त्यांच्यावर] ऐकले की: जे या जगात लोकांवर जुलुम अत्याचार करतात, त्यांना हिशेबाच्या दिवसी नरक यातना दिल्या जातील.