عَنْ أَبِي مُـحَمَّدٍ الحَسَنِ بْنِ عَلِيِّ بْنِ أَبِي طَالِبٍ - سِبْطِ رَسُولِ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ وَرَيْحَانَتِهِ-، قَالَ: حَفِظْتُ مِنْ رَسُولِ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«دَعْ مَا يَرِيبُك إلَى مَا لَا يَرِيبُكَ».
[صحيح] - [رواه الترمذي والنسائي] - [الأربعون النووية: 11]
المزيــد ...
अबु मुहम्मद हसन बिन अबी तालीब-जे प्रेषितांचे नातु व त्यांचा जणु सुगंध आहेत-,सांगतात की:मी प्रेषितांकडुन सलामती असो त्यांच्यावर ऐकलेलं आहे की:
<<ज्या गोष्टी मध्ये शंका येत असेल तिला सोडुन द्या, आणी त्या गोष्टीचा स्वीकार करा ज्यात शंका नसेल>>.
[صحيح] - [رواه الترمذي والنسائي] - [الأربعون النووية - 11]
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आदेश दिला आहे की, माणसाने त्या गोष्टी व ती कर्म सोडुन दिली पाहिजे ज्यांच्या बाबतीत शंका उपस्थित होत असेल की त्या हराम किंवा मनाई केलेली आहेत किंवा हलाल म्हणजे मान्यताप्राप्त आहेत, अशा वेळेत त्या बाबीं व कर्माकडे वळावे ज्यामध्ये कुठलीच शंका नाही, त्याच गोष्टींचा स्वीकार करावा ज्यात पुर्णतः चांगुलपणा व भलाई स्पष्ट असेल.