عَنْ أَبِي سَعِيدٍ الخُدْرِيِّ رضي الله عنه أَنَّ النَّبِيَّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«إِنَّ مِنْ أَعْظَمِ الجِهَادِ كَلِمَةَ عَدْلٍ عِنْدَ سُلْطَانٍ جَائِرٍ».
[حسن لغيره] - [رواه أبو داود والترمذي وابن ماجه وأحمد] - [سنن الترمذي: 2174]
المزيــد ...
अबू सईद खुदरी (अल्लाह प्रसन्न) सांगतात की पैगंबर (स.) म्हणाले:
"जिहादचा एक मोठा प्रकार म्हणजे जुलमी शासकांसमोर न्यायासाठी बोलणे."
[حسن لغيره] - [رواه أبو داود والترمذي وابن ماجه وأحمد] - [سنن الترمذي - 2174]
अल्लाहचे पैगंबर (शांतता आणि आशीर्वाद) म्हणाले की अल्लाहच्या मार्गातील जिहादचा एक महत्त्वाचा आणि फायदेशीर प्रकार म्हणजे कोणत्याही अत्याचारी शासकांसमोर सत्य आणि न्याय बोलणे, कारण ते चांगल्या कामाचा आदेश देणे आणि वाईट काम रोखणे या कार्यक्षेत्रात येते, हे कार्य कथनाने, कृतीने, लेखनाने किंवा इतर कोणत्याही मार्गाने केले जाऊ शकते, जेणेकरून हेतू साध्य होईल आणि वाईट दूर होईल.