عَنِ ابنِ مَسعُودٍ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ: قَالَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«لَا يَحِلُّ دَمُ امْرِئٍ مُسْلِمٍ إِلَّا بِإِحْدَى ثَلَاثٍ: الثَّيِّبُ الزَّانِي، وَالنَّفْسُ بِالنَّفْسِ، وَالتَّارِكُ لِدِينِهِ المُفَارِقُ لِلْجَمَاعَةِ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم: 1676]
المزيــد ...
हजरत अब्दुल्लाह बिन मसूद अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर यांनी फरमावले:
<<तीन परिस्थितींशिवाय कोणत्याही मुसलमानाचे रक्त (प्राण घेणे) हलाल नाही: (१) विवाहबद्ध असून व्यभिचार करणारा, (२) प्राणाच्या बदल्यात प्राण (खून करणारा), (३) तो व्यक्ती जो आपला धर्म सोडतो आणि मुसलमानांच्या जमातीतून वेगळा होतो>>.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم - 1676]
प्रेषित सलामती असो त्यांच्यावर यांनी सांगितले आहे की मुसलमानाचे रक्त (प्राण) अत्यंत पवित्र व सुरक्षित आहे; परंतु जर तो व्यक्ती या तीनपैकी कोणतेही एक कृत्य करतो, तर (शरई नियमांनुसार) त्याच्यावर मृत्युदंडाची शिक्षा लागू होऊ शकते: पहिली: जो व्यक्ती योग्य निकाहाद्वारे विवाहबद्ध असताना व्यभिचार (झिना) करतो, त्याची शिक्षा रज्म (दगड मारून ठार करणे) आहे. दुसरी: जो व्यक्ती कोणत्याही निष्पाप व्यक्तीचा जाणूनबुजून आणि अन्यायाने खून करतो, तर शरई अटी पूर्ण झाल्यास, क़िसास म्हणून त्याला ठार मारले जाईल. तिसरी: जो व्यक्ती मुसलमानांच्या जमातीतून बाहेर पडतो; म्हणजे तो पूर्णपणे इस्लाम सोडून मुरतद (धर्मत्यागी) होतो, किंवा इस्लामच्या काही आदेशांना नाकारून जमातीतून वेगळा होतो, जसे बंडखोर, दरोडेखोर, रस्तालुटारू, किंवा खवारिज व इतर शस्त्रधारी लढाऊ गट.