عَنْ سَهْلِ بْنِ سَعْدٍ رَضِيَ اللهُ عَنْهُ أَنَّ رَسُولَ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«لَا يَزَالُ النَّاسُ بِخَيْرٍ مَا عَجَّلُوا الْفِطْرَ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم: 1098]
المزيــد ...
सहल इब्न साद (रज़ी अल्लाहु अन्हु) यांनी सांगितले की, अल्लाहचे प्रेषित (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) म्हणाले.
"जोपर्यंत लोक उपवास सोडण्याची घाई करतील तोपर्यंत ते चांगल्या स्थितीत राहतील."
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم - 1098]
या हदीसमध्ये पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) सांगत आहेत की जोपर्यंत लोक उपवास सोडण्याची घाई करतील तोपर्यंत ते चांगल्या स्थितीत राहतील, कारण या कृतीने ते सुन्नतचे पालन करतील. जेव्हा ते सुन्नतच्या विरोधात जाऊन उशिरा उपवास सोडायला सुरुवात करतात, तेव्हा ते त्यांच्याकडून चांगुलपणा हिरावून घेतला जात असल्याचा पुरावा असेल, कारण असे केल्याने, ते पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी आपल्या समुदायाला दिलेल्या सुन्नतला सोडून देण्याचे कृत्य करतील आणि त्यांनी (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) त्यांना स्वीकारण्याचा आदेश दिला होता.