عَنْ أَبِي العَبَّاسِ سَهْلِ بْنِ سَعِدٍ السَّاعِدِيِّ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ: جَاءَ رَجُلٌ إِلَى النَّبِيِّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ، فَقَالَ: يَا رَسُولَ اللَّهِ، دُلَّنِي عَلَى عَمَلٍ إِذَا عَمِلْتُهُ أَحَبَّنِي اللَّهُ وَأَحَبَّنِي النَّاسُ، فَقَالَ:
«ازْهَدْ فِي الدُّنْيَا يُحِبُّكَ اللَّهُ، وَازْهَدْ فِيمَا عِنْدَ النَّاسِ يُحِبُّكَ النَّاسُ».
[قال النووي: حديث حسن] - [رواه ابن ماجه وغيره بأسانيد حسنة] - [الأربعون النووية: 31]
المزيــد ...
अबु अब्बास सहल बिन साअद साअदी रजिअल्लाहु अनहु कथन करतात की: एक व्यक्ती प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर आला व विचारु लागला की:हे प्रेषिता, मला असे क्रुत्य सांगा, जे केल्याने साक्षात अल्लाह चे प्रेम मला लाभावे, व सोबत लोकांचें प्रेम सुद्धा प्राप्त व्हावे, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की:
<<जगाच्या मोहमाये पासुन अनभिज्ञ राहा, अल्लाह तुमच्यावर प्रेम करील, आणी लोकांच्या संपत्ती पासुन अनभिज्ञ राहा,लोकं तुमच्यावर प्रेम करतील>>.
[قال النووي: حديث حسن] - [رواه ابن ماجه وغيره بأسانيد حسنة] - [الأربعون النووية - 31]
सदर हदिस मधे एका व्यक्तीने प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर प्रश्न केला की असे आचरण करावे ज्यामुळे त्याला अल्लाह चे व त्याच्या निर्मिती चे प्रेम त्याला मिळावे, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर त्या व्यक्तीला सांगितले की: जेव्हा मनुष्य जगातील बे फायदा व परलोकातील फायदा न देणारे [क्रुत्य] कर्म सोडून देतो, तेव्हा अल्लाह त्या दातांवर प्रेम करु लागतो, तसेच मनुष्य लोकांजवळ असणाऱ्या मालमत्ते ची लालसा ठेवत नाही, त्यांचा हेवा किंवा द्धेष करत नाही, त्यामुळे लोकं सुद्धा त्याच्यावर प्रेम करु लागतात, कारण लोकं जगावर खुप प्रेम करतात, त्याविरुद्ध जो व्यक्ती लोकांकडे मालमत्ते साठी तगादा लावतो, लोकं त्याच्यावर नाराज होतात, आणी जो व्यक्ती लोकांच्या संपत्तीवर नजर ठेवत नाही, त्याची लोकांच्या मनात प्रेमळ जागा बनते.