عَنْ عَبْدِ اللهِ بْنِ مَسْعُودٍ رَضيَ اللهُ عنهُ قَالَ: قَالَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«لاَ تَتَّخِذُوا الضَّيْعَةَ فَتَرْغَبُوا فِي الدُّنْيَا».
[حسن لغيره] - [رواه الترمذي وأحمد] - [سنن الترمذي: 2328]
المزيــد ...
अब्दुल्लाह बिन मसऊद (रज़ी अल्लाहु अन्हु) म्हणतात की, रसूलुल्लाह सलल्लाहु अलैहि व सलल्म यांनी म्हटले —
"जमीन-जुमला (मालमत्ता) मिळविण्याचा ध्यास घेऊ नका, नाहीतर तुम्ही दुनियेकडे (या जगाच्या सुखांकडे) झुकाल."
[حسن لغيره] - [رواه الترمذي وأحمد] - [سنن الترمذي - 2328]
नबी सल्लल्लाहू अलैहे व सलल्म यांनी बाग, शेती किंवा जमीन-जुमला मिळविण्यापासून मनाई केली आहे, कारण हे सर्व गोष्टी माणसाला दुनियेच्या प्रेमात आणि तिच्या मोहात पाडतात, आणि त्यामुळे तो अखेरतपासून (परलोकापासून) बेफिकीर होतो.