Hadith: मनुष्य आपल्या पोटापेक्षा खराब कोणतंच ताट भरत नाही, आदम च्या पुत्राला फक्त मोजके घास पुरेसे आहेत, पाठ सरळ करण्या करता, जर पोटभर जेवायचं असल्यास, पोटाचे तिन भागात विभाजन करावे, एक त्रुतिआंश जेवढा करता, एक त्रुतिआंश पाण्यासाठी व एक त्रुतिआंश हवे करीता रिकामा ठेवावा
हजरत मिकदाम बिन मआदी करिब रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की:मी प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर उपदेश करतांना ऐकले: <<मनुष्य आपल्या पोटापेक्षा खराब कोणतंच ताट भरत नाही, आदम च्या पुत्राला फक्त मोजके घास पुरेसे आहेत, पाठ सरळ करण्या करता, जर पोटभर जेवायचं असल्यास, पोटाचे तिन भागात विभाजन करावे, एक त्रुतिआंश जेवढा करता, एक त्रुतिआंश पाण्यासाठी व एक त्रुतिआंश हवे करीता रिकामा ठेवावा>>. [صحيح] - [رواه الإمام أحمد والترمذي والنسائي وابن ماجه] - [الأربعون النووية - 47]
Explanation
प्रेषित मुहम्मदांनी सलामती असो त्यांच्यावर मानवतेला एक अप्रतिम निरोगी जिवनाचं सुत्र दिलं, मनुष्याने तेवढेच जेवण करावे, जेवढि गरज आहे, अति जेवण शारिरीक द्रुष्ट्या हानीकारक आहे
पोट भरुन जेवणे पुष्कळ आजाराला निमंत्रण आहे, भरभरुन जेवणामुळे कधी कधी ऊशीरा व कधी लवकर वाईट परिणाम दिसतो मग ते आजार आंतरिक किंवा बाह्यरुपी असु शकतो. मग प्रेषित सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की:जर जेवण पोट भरुन करायचं असल्यास, पोटाचे तिन हिस्से करावे,
एका हिस्सा जेवणा करीता,
दुसरा हिस्सा पाणी पिण्यासाठी,
तिसरा हिस्सा हवे करीता ठेवावा,
हे या साठी आहे की,जास्त जेवणामुळे पोट तंग व पोटाचे विकार किवा अल्लाह च्या उपासने [नमाज]बाबत आळस निर्माण होऊ नये.
Benefits from the Hadith
जेवणा बाबत काळजी घ्यावी, पोटभरुन व जास्त जेवणाने शारीरिक व मानसीक आजार उत्पन्न होतात, कमी जेवणे निरोगी जिवनाचे एक सुत्र आहे.
खाणे पिण्याचा उद्देश्य शरीर निरोगी व मजबुत असावे, जेणेकरुन शरीराचे रक्षण होते.
पोट भरुन जेवणामुळे शारीरिक व मानसिक आजार उत्पन्न होतात,
हजरत उमर रजिअल्लाहु अनहु फरमावितात की:<<पोट भरुन जेवणे बंद करा, त्यामुळे शरीरात नवनवे रोग निर्माण होतात, नमाज मध्ये सुस्ती व आळस येतो>>.
जेवणा बाबत सुद्धा धर्मोपदेश खालीलप्रमाणे आहेत:
अ]अत्यावश्यक [वाजीब] जेवणं ते जेवण जे जिव वाचवण्याकरता अत्यावश्यक आहे.
ब]वैध जेवण थोडंसं शील्लक परंतु त्यामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही.
क] अनावश्यक [मकरुह] ज्यामुळे शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.
ढ]मुस्तहब [पसंदप्राप्त] ज्यामुळे अल्लाह ची भक्ती करणे सोपे होते.
हदिस मध्ये जेवणाचे तिन टप्पे सांगण्यात आले आहेत:
पहिले:पोट भर जेवणे,
दुसरे:मोजके घास ज्यामुळे पाठ सरळ होईल.
तिसरे:<<एक तृतीयांश त्याच्या अन्नासाठी, एक तृतीयांश त्याच्या पाण्यासाठी आणि एक तृतीयांश त्याच्या श्वासासाठी>>.
हे सर्व तेव्हाच लागू होते, जेव्हा खाल्ले जाणारे अन्न हलाल (वैध) असते.
सदर हदिस शरिराविज्ञानाच्या मुळ नियमावर मार्गदर्शन करते, शरीरशास्त्र ज्या नियमावर आधारित आहे, शरीरात उर्जा सुरक्षीत करणे, पथ्य व शरीरातुन बेकाम पदार्थ बाहेर काढणे,सदर हदिस मधे पहिल्या दोन मुद्दांवर प्रकाश टाकण्यात आला आहे, जसे अल्लाह म्हणतो:(खा आणि प्या, पण उधळपट्टी करू नका; निश्चयच अल्लाह उधळपट्टी करणाऱ्यांना पसंत करत नाही) [अल आराफ:३१].
ईस्लामी पद्धती ची व्यापकता ईस्लाम ची शिकवण मानवाला या जगात व परलोकात भलाई ची शाश्वती देते.
शरीयतच्या विज्ञानांमध्ये वैद्यकशास्त्राची मूलतत्त्वे आणि त्याचे प्रकारही समाविष्ट आहेत, जसे मध आणि काळी जिरे (हब्बतुस्सौदा) यांचा उल्लेख.
शरीयत ची संपूर्ण शीकवण दुरद्रुष्टीवर आधारित आहे, या शीकवणीचा मुळ ऊद्देश्य मानवाला नफा पोहचवणे व नुकसान पासुन वाचवणे आहे.