عَن عَائِشَةَ أُمِّ المؤْمِنين رضي الله عنها زَوْجَ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ حَدَّثَتْهُ قَالَتْ:
جَاءَتْنِي امْرَأَةٌ مَعَهَا ابْنَتَانِ تَسْأَلُنِي، فَلَمْ تَجِدْ عِنْدِي غَيْرَ تَمْرَةٍ وَاحِدَةٍ، فَأَعْطَيْتُهَا فَقَسَمَتْهَا بَيْنَ ابْنَتَيْهَا، ثُمَّ قَامَتْ فَخَرَجَتْ، فَدَخَلَ النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ فَحَدَّثْتُهُ، فَقَالَ: «مَنْ يَلِي مِنْ هَذِهِ البَنَاتِ شَيْئًا، فَأَحْسَنَ إِلَيْهِنَّ، كُنَّ لَهُ سِتْرًا مِنَ النَّارِ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 5995]
المزيــد ...
आईशा रजिअल्ला अनहा वर्णन करते की:
माझ्या घरी एका दिवसी एक महिला आली, तिच्यासोबत दोन लहान मुली होत्या, तिने मला काही मागीतले, परंतु माझ्याकडे एक खजुर च्या ऐवजी काहीच नव्हते, मी तिला एक खजुर दिली, तिनं त्या खजुर चे दोन तुकडे केले व दोन्ही मुलींना वाटुन दिले व स्वतः काहीच खाल्ले नाही, मग ती निघुन गेली, तेवढ्यात प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम घरी आले, मी सर्व किस्सा प्रेषितांना ऐकविला, त्यावर प्रेषित म्हणाले:<<जो माणुस आपल्या मुली बाबत आजमावल्या जाईल,व त्याने त्यांच्या सोबत सदव्यवहार केला.तर त्या मुली त्यांच्या वडीलांकरता नरका च्या अग्नी पासुन ढाल व आड बनतील>>.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 5995]
आईशा रजिअल्ला अनहा च्या घरी एक महिला आली व तिच्या सोबत दोन मुली होत्या, व ती महिला गरीब होती व या आईशा रजिअल्ला अनहा ला काही मागणी करत होती, मा आईशा रजिअल्ला अनहा जवळ तिला द्यायला काहीच नव्हते, फक्त एक खजुर होती, त्यांनी तिला एक खजुर देउन टाकली, त्या महिलेने त्या खजुर चे दोन भाग केले व दोन्ही मुलींना वाटुन दिली, व स्वतः काहीच खाल्ले नाही, प्रेषित {अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर} जेव्हा मा आईशा रजिअल्ला अनहा च्या घरी आले, त्यांनी सर्व व्रुत्तांत सांगितला:प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: ज्या माणसाला आपल्या मुली विषयी परिक्षेत टाकल्या गेले, व तरीही त्याने त्यांच्या सोबत सदव्यवहार केला, तर त्या मुली बापाकरता नरकाच्या आगी पासुन ढाल व आड बनतील.