عَنِ ابْنِ عَبَّاسٍ رضيَ اللهُ عنهما:
أنَّهُ قَالَ لعَطَاءِ بْنِ أَبِي رَبَاحٍ: أَلَا أُرِيكَ امْرَأَةً مِنْ أَهْلِ الْجَنَّةِ؟ قُلْتُ: بَلَى، قَالَ: هَذِهِ الْمَرْأَةُ السَّوْدَاءُ، أَتَتِ النَّبِيَّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ، قَالَتْ: إِنِّي أُصْرَعُ وَإِنِّي أَتَكَشَّفُ، فَادْعُ اللهَ لِي، قَالَ: «إِنْ شِئْتِ صَبَرْتِ وَلَكِ الْجَنَّةُ، وَإِنْ شِئْتِ دَعَوْتُ اللهَ أَنْ يُعَافِيَكِ» قَالَتْ: أَصْبِرُ، قَالَتْ: فَإِنِّي أَتَكَشَّفُ فَادْعُ اللهَ أَنْ لَا أَتَكَشَّفَ، فَدَعَا لَهَا.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم: 2576]
المزيــد ...
अब्दुल्ला बिन अब्बास रजिअल्लाहु अनहु द्वारा निवेदन आहे की:
त्यांनी अता बिन रबाह ला विचारले की,काय मी तुम्हाला साक्षात जिवंत जन्नती {स्वर्गात जाणारी} महिला न दाखवु ? त्यावर अता बिन रबाह म्हणाले की, जरुर दाखवा!
इब्ने अब्बास रजिअल्लाहु अनहु नी सविस्तर वर्णन केले,एक काळी महिला प्रैषितां जवळ आली व म्हणाली की,मला मिरगी चे झटके येतात व त्यात माझं अंग नग्न होतंय, माझ्या करता अल्लाह जवळ दुआ करा! प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले<<जर तु संयम ठेवला तर त्याचा बदल्यात तुला जन्नत मिळेल, किंवा मी तुझ्या तंदुरुस्तीसाठी अल्लाह जवळ दुआ याचना करतो>>त्यावर ती महिला म्हणाली की: मी सब्र व संयम ठेवणार.नंतर म्हणाली की:माझं अंतरंग नग्न होऊ नये ,एवढीच अल्लाह कडे दुआ करा! किंबहुना प्रेषितांनी तिच्या करता दुआ केली.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم - 2576]
वरील हदिस मधे याबाबत सविस्तर वर्णन आहे की,ईब्ने अब्बास रजिअल्लाहु अनहु नी आपले शिष्य अता बिन रबाह [अल्लाह रहम करो]ला सांगितले की,काय मी तुम्हाला एक स्वर्गीय महिला न दाखवु? त्यावर ते म्हणाले,का नाही! त्यावर इब्ने अब्बास रजिअल्लाहु अनहु या हबशी [निग्रो] महिला ला बघा तिला मिरगी चे झटके येत असत व त्यामुळे ति नग्न होत असे, तिनं प्रेषितांना या विषयी सांगितले व प्रेषितांना विनवणी केली की तुम्ही माझ्या करता दुआ करा! ज्यामुळे मला या आजारापासुन मुक्ती मिळेल, त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले की,तु म्हणतेस तर मी अल्लाह कडे दुआ करतो व जर तुझी मर्जी असेल तर तु सब्र व संयम बाळग त्या बदल्यात तुला [जन्नत] स्वर्ग मिळे, ती चटकन उत्तरली की: जरुर संयम ठेवते, तदनंतर ती महिला प्रेषितांना म्हणाली की: हे अल्लाह च्या प्रेषिता! मिरगी च्या अवस्थेत माझं अंतरंग नग्न होते, फक्त अल्लाह कडे दुआ करा की माझं अंग नग्न होऊ नये, किंबहुना प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी दुआ केली की, ती नग्न न व्हावी! तद्नंतर तिला मिरगी चे झटके तर येत, पण तीचं अंतरंग दिसत नसे.