عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رَضِيَ اللهُ عَنْهُ عَنِ النَّبِيِّ صلَّى اللَّهُ عليْه وسلَّمَ، قَالَ:
«إِذَا أُقِيمَتِ الصَّلَاةُ فَلَا صَلَاةَ إلَّا المَكْتُوبَةُ».

[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 710]
المزيــد ...

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

हजरत अबु हुरैरा अल्लाह त्याच्यावर प्रसन्न असो कथन करतात की: प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:
<<जेव्हा फर्ज नमाज करता ईकामा पुकारल्या गेली तर मग फर्ज नमाज व्यतिरिक्त अन्य कोणतीच नमाज (अदा केल्या जाणार) मान्य नाही>>.

[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 710]

स्पष्टीकरण

प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी त्या व्यक्तीला त्या वेळी नफिल नमाज सुरू करण्यास मनाई केली आहे, ज्या वेळी सामुहिक (अनिवार्य) फर्ज नमाज साठी ईकामा पुकारल्या गेली असेल, अशा वेळी फक्त आणी फक्त फर्ज अनिवार्य सामुहिक नमाज अदा करणे आवश्यक आहे.

हदिसचे फायदे

  1. जेव्हा फर्ज नमाज साठी हाक ईकामा पुकारल्या गेली त्यावेळी मस्जीद मध्ये नफिल ऐच्छिक नमाज अदा करणे मना आहे.
  2. ईकामा पुकारल्या नंतर ईतर कोणतीही नमाज सुरू करणे योग्य नाही, मग ती सुन्नते मौकेदा असुदे किंवा फज्र व जोहर नमाज पैकी सुन्नत असो की ईतर ऐच्छीक नमाज असो.
  3. जर ईकामा वेळी एखादा व्यक्ती ऐच्छीक नमाज अदा करत असेल; आणी जर त्या व्यक्ती ची एक रकाअत पेक्षा कमी नमाज बाकी असेल तर मग तशा परिस्थितीत उरलेली नमाज लवकर अदा करावी, आणी जर ऐच्छीक नमाज एका रकाअत पेक्षा जास्त उरली असेल तर नफिल नमाज मोडुन, तकबिर ए तहरिमा म्हणजे सामुहिक नमाज च्या सुरुवातीच्या क्षणांमध्ये सामील होण्याचा लाभ उचलावा.
भाषांतरे दाखवा
भाषा: الإنجليزية الأوردية الإندونيسية अधिक (28)
अधिक