عَنْ أَنَسِ بْنِ مَالِكٍ رَضِيَ اللهُ عَنْهُ أَنَّ رَسُولَ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«أَتِمُّوا الصَّفَّ المُقَدَّمَ، ثُمَّ الَّذِي يَلِيهِ، فَمَا كَانَ مِنْ نَقْصٍ فَلْيَكُنْ فِي الصَّفِّ المُؤَخَّرِ».

[صحيح] - [رواه أبو داود والنسائي] - [سنن أبي داود: 671]
المزيــد ...

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

हजरत अनस बिन मालीक रजि.वर्णन करतात की: प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:
<<नमाज मध्ये प्रथम रांगेला पुर्ण करा, तदनंतर त्यालगत च्या, जर कुण्या रांगेत पोकळी राहत असेल तर अंतिम रांगेत असावी>>.

[صحيح] - [رواه أبو داود والنسائي] - [سنن أبي داود - 671]

स्पष्टीकरण

प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर सामुहिक नमाज अदा करणाऱ्या पुरुषांना हुकुम दिला आहे की, सर्वप्रथम पहिल्या रांगेला पुर्ण करावे, त्यानंतर त्यालगतच्या रांगेला पुर्ण करावे, अशा पद्धतीने क्रमानुसार, जर कोणती रांग अपुर्ण राहत असेल तर ती शेवटची रांगच असावी.

हदिसचे फायदे

  1. नमाज मध्ये सरळ रांगेतच उभे राहणे व रांगाना पुर्ण करणे पैगंबरांची सलामती असो त्यांच्यावर शिकवणी पैकी आहे.
  2. नमाजी मंडळींनी सर्वप्रथम पहिल्या रांगेला पुर्ण करावे व त्यात रिकामी जागा सोडु नये, जर शील्लक जागा उरत असल्यास, ती शेवटच्या रांगेत उरली पाहिजे, पहिल्या किंवा मधातल्या रांगेत कदापिही पोकळी ठेऊ नये.
भाषांतरे दाखवा
भाषा: الإنجليزية الأوردية الإندونيسية अधिक (28)
अधिक