अबु हुरैरा रजिअल्लाहुअनहु वर्णन करतात की:प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की: <<मनुष्याच्या ईस्लाम ची एक विशेषत ही आहे की, त्याने त्या गोष्टी सोडुन द्याव्यात, ज्यांचा त्याच्याशी काही देणंघेणं नाही>>. [قال النووي: حديث حسن] - [رواه الترمذي وغيره] - [الأربعون النووية - 12]
Explanation
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर सखो़लपणे स्पष्ट केले आहे की: एका मुसलमानाच्या ईस्लाम ची श्रेष्ठता व उच्चता यात आहे की, त्या सर्व गोष्टी पासुन अलिप्त राहावे, ज्याचा त्या गोष्टींशी काहिच संबंध नाही, ना काही फायदा आहे, ना धार्मिक, ना जगातील गरज आहे, कारण जी वस्तु कोणत्याच कामाची नाही, बेकार कामात गुंतण्यामुळे, तो अत्यावश्यक व महत्वाच्या गोष्टी पासुन वंचित राहतो, जे त्याच्या अत्यंत महत्त्वाचे होते, अनेकदा असे घडते की बेकार कार्यात गुंतल्यामुळे पुढे तो नको त्या अवस्थेत पोहचतो, जिथे जाणे त्याला घातक आहे; कारण मानवाला कयामत च्या दिवसी आपल्या कर्माचा हिशेब दयावा लागेल.
Benefits from the Hadith
लोकं ईस्लाम मध्ये वेगवेगळ्या दर्जावर विराजमान आहेत, काही क्रुत्य अशी आहेत, ज्यामुळे मनुष्याचा ईस्लाम अधिक सुंदर व व्रुद्धींगत होतो.
बेकार व फालतु गोष्टी सोडुन देणे, हे ईस्लाम च्या प्रगल्भतेचे प्रतिक आहे.
सदर हदिस वरुन सिद्ध होते की, मनुष्याने स्वताला धार्मिक व वैयक्तिक कार्यात मग्न ठेवावे, जे खरोखर त्याच्या हिताचे आहे, जर बेकार गोष्टी पासून दूर राहणे, ईस्लाम ची सुंदरता आहे, तर सकारात्मक व कल्याणकारी कार्यात व्यस्त राहणे सुद्धा एक सुंदर वैशिष्ट्याचा एक भाग आहे.
ईब्ने कय्यीम रहमतुल्लाह सांगतात की:प्रेषित मुहम्मदांनी सलामती असो त्यांच्यावर संपुर्ण वरह [ईशभिरुता व ईशपारायणता] एका वाक्यात समजावुन सांगितली, अर्थात <<मानवाच्या ईस्लाम ची श्रेष्ठता आहे की, तो अनावश्यक गोष्टी सोडुन देतो>>,
मग त्याचं अनावश्यक बोलणे, पाहणे, ऐकणे, हात पायाचा वापर, विचार विमर्श करणे, ते प्रत्येक दार्शनिक वा आंतरिक कार्य सामील आहेत, हे वरहच्या बाबतीत सखोल व परिपूर्ण श्लोक आहे.
ईब्ने रजब रहमतुल्लाह सांगतात की, सदर हदिस आदाब च्या मुळ तत्वांपैकी एक मुळतत्व सांगते.
ज्ञान संपादन करण्यावर भर देण्यात आला आहे;कारण ज्ञानामुळेच मनुष्य जाणतो की, कोणती गोष्ट त्याच्या करता जरुरी आहे किंवा गैर जरुरी आहे.
अम्र बिल मारुफ व नाहि अनिल मुनकर [भलाई पसरवणे व बुराई रोकणे] तसेच सत्याची तलकीन करणे मानवावर एक जबाबदारी आहे.
सदर हदिस वरुन ते सर्व अनावश्यक क्रुत्य शामील आहेत:ते क्रुत्य, जे अल्लाह व प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी मना केलेले आहेत किंवा ते ज्यांना नापसंद केले आहे, त्या गोष्टी मधे व्यस्त होणे ज्यांचा परलोकात काहिच फायदा नाही, जसे अद्रुष्य [गैबी]गोष्टींचे विस्त्रुत विवरण करणे, किंवा फालतु व अशक्य गोष्टींचे संशोधन व चर्चा करणे.