عَن قُطْبَةَ بنِ مَالِكٍ رَضيَ اللهُ عنه قَالَ: كَانَ النَّبِيُّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَقُولُ:
«اللَّهُمَّ إِنِّي أَعُوذُ بِكَ مِنْ مُنْكَرَاتِ الأَخْلاَقِ وَالأَعْمَالِ وَالأَهْوَاءِ».
[صحيح] - [رواه الترمذي] - [سنن الترمذي: 3591]
المزيــد ...
हजरत कुत्बा बिन मलिक (रजियल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्याकडून असे सांगितले आहे की, प्रेषित (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) म्हणत असत:
"हे अल्लाह! मी वाईट सवयी, वाईट कृत्ये आणि वाईट विचारांपासून तुझा आश्रय घेतो."
[صحيح] - [رواه الترمذي] - [سنن الترمذي - 3591]
पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या प्रार्थनेपैकी एक होती: (हे अल्लाह! मी आश्रय घेतो) आणि मी तुझ्या मध्यस्थी आणि आश्रयाने तुझ्याकडे येतो, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाच्याही हाती नाही, (अल्लाह आणि त्याच्या पैगंबराने ज्या वाईट गोष्टींना मनाई केली आहे त्यापासून), (वाईट शिष्टाचारांपासून) जसे की वाईट अंतःकरण, मत्सर आणि अहंकार, (आणि वाईट कृत्यांपासून) जसे की शाप, वाईट बोलणे, (आणि सर्व वाईट विचारांपासून) ज्या आत्म्याला हव्या असतात आणि ते शरीयतच्या विरुद्ध आहेत.