عَنْ أَنَسِ بْنِ مَالِكٍ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ: قَالَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«انْصُرْ أَخَاكَ ظَالِمًا أَوْ مَظْلُومًا». فَقَالَ رَجُلٌ: يَا رَسُولَ اللَّهِ، أَنْصُرُهُ إِذَا كَانَ مَظْلُومًا، أَفَرَأَيْتَ إِذَا كَانَ ظَالِمًا كَيْفَ أَنْصُرُهُ؟ قَالَ: « تَحْجُزُهُ -أَوْ تَمْنَعُهُ- مِنَ الظُّلْمِ؛ فَإِنَّ ذَلِكَ نَصْرُهُ».
[صحيح] - [رواه البخاري] - [صحيح البخاري: 6952]
المزيــد ...
अनस बिन मालीक रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:
<<आपल्या बंधु ची मदत करा,तो अत्याचारी असो की अन्यायग्रस्त>>.
एका व्यक्तीने विचारले की: हे प्रेषिता अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर अन्यायग्रस्त ची मदत तर मी समजु शकतो, परंतु अत्याचारी ची मदत? कशी करु? तेव्हा प्रेषित सलामती असो त्यांच्यावर म्हणाले: तुम्ही त्याला अत्याचार करण्यापासुन रोकावे, हिच त्याची मदत आहे.
[صحيح] - [رواه البخاري] - [صحيح البخاري - 6952]
प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की आपल्या बंधु ची मदत करा, त्याला वाऱ्यावर सोडू नका, मग तो जालीम असो की मजलुम (जुलुम सहन करणारा), एक साहाबी ने प्रतिप्रश्न केला की: मजलुम ची मदत तर त्यावरील जुलुम समाप्त करुन मदत करील, परंतु जर तो दुसऱ्या वर जुलुम करत असेल तर मी त्याची मदत कशी करु? प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: तुम्ही त्याला जुलुम करण्यापासुन रोकावे, हिच त्याची मदत करणे आहे.