عَنْ أَبِي مُوسَى رَضيَ اللهُ عنه عَنِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«مَثَلُ مَا بَعَثَنِي اللَّهُ بِهِ مِنَ الهُدَى وَالعِلْمِ كَمَثَلِ الغَيْثِ الكَثِيرِ أَصَابَ أَرْضًا، فَكَانَ مِنْهَا نَقِيَّةٌ، قَبِلَتِ المَاءَ، فَأَنْبَتَتِ الكَلَأَ وَالعُشْبَ الكَثِيرَ، وَكَانَتْ مِنْهَا أَجَادِبُ، أَمْسَكَتِ المَاءَ، فَنَفَعَ اللَّهُ بِهَا النَّاسَ، فَشَرِبُوا وَسَقَوْا وَزَرَعُوا، وَأَصَابَتْ مِنْهَا طَائِفَةً أُخْرَى، إِنَّمَا هِيَ قِيعَانٌ لاَ تُمْسِكُ مَاءً وَلاَ تُنْبِتُ كَلَأً، فَذَلِكَ مَثَلُ مَنْ فَقُهَ فِي دِينِ اللَّهِ وَنَفَعَهُ مَا بَعَثَنِي اللَّهُ بِهِ، فَعَلِمَ وَعَلَّمَ، وَمَثَلُ مَنْ لَمْ يَرْفَعْ بِذَلِكَ رَأْسًا، وَلَمْ يَقْبَلْ هُدَى اللَّهِ الَّذِي أُرْسِلْتُ بِهِ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 79]
المزيــد ...
अबी मुसा अशअरी रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले आहे की:
<<मला सर्वोच्च अल्लाह ने जे ज्ञान व सरळ मार्गासह पाठविले, त्याचे उदाहरण त्या पावसा सारखे आहे जो जमीनीवर पडला असता जमीनीचा काही हिस्सा भुसभुशीत होता, त्या जमीनी ने त्या पाण्याला शोषुन घेतले,
त्याद्वारे गवत व ईतर वनस्पती उगवली,
जमीनीचा दुसरा भाग कठीण होता, या कठीण भागाने पाण्याला जमा करून ठेवले, व याद्वारे अल्लाह ने लोकांना फायदा दिला, ते पाणी लोकांनी प्यायला ठेवले, आपल्या जनावरांना सुद्धा पाजले, तसेच शेतीकरता तेच पाणी वापरले,
जमीनीचा तिसरा हिस्सा मात्र ओसाड भाग होता, या जमीनीवर पाउस पडला असता त्या जमीनीने ना पाणी जमा केले, ना गवत उगवले,
पहिले उदाहरण त्या लोकांचे आहे, ज्यांनी अल्लाह चा धर्म समजुन घेतला व त्याचे फायदे सांगितले, अल्लाहने जे मार्गदर्शन देउन मला पाठविले आहे, त्याचे ज्ञान संपादन केले, व ते ज्ञान दुसऱ्या पर्यंत पोहोचविले, [येणाऱ्या पिढ्यापर्यंत पोहचविले] व दुसरे उदाहरण त्या लोकांचे आहे, ज्यांनी या प्रकाशाकडे पाहिले नाही, व पाठ फिरविली, व ज्या ज्ञान व प्रकाश घेउन मला पाठविले आहे, त्याचा स्वीकार न करता, धिक्कार केला>>.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 79]
प्रेषित मुहम्मद अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर नी आश्चर्यकारक पणे त्या व्यक्ती विषयी माहिती दिली,जे प्रेषितांच्या आणलेल्या ज्ञानावर व मार्गावर चालुन, फायदा करुन घेतो, व अंतिम सत्याकडे मार्ग दाखवतो, त्या व्यक्ती चे उदाहरण त्या जमीनीसारखे आहे, तिच्यावर पावसाचे पाणी पडते, व त्या जमीनीचे तिन प्रकार आहेत: पहिला: सुपिक व पिकणारी जमीन, जे पावसाचं पाणी शोषून घेते, त्याद्वारे गवत व वेगवेगळे प्रकारचे वनस्पती, फळ फळावळे व व्रुक्ष उगवते, त्याचा सर्वांना फायदाच होतो. आणि दुसरी जमीन पाणी शोषण नाही, परंतु पाण्याला जमा करुन ठेवते, स्वत शेती उगवत तर नाही, मात्र थांबलेलं पाणी, ज्याचा सरळ फायदा जनावरांना पिण्याकरता व शेतीला सुद्धा होतो. आणि तिसरा जमीन सपाट: जे न पाणी जमा करते, ना शेतीला फायदा करते, म्हणजे अशी जमीन जी स्वतः उपयोग घेत नाही व अन्य कुणी फायदा घेऊ शकत नाही. अशाप्रकारे ते लोकं जे प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी आणलेल्या ज्ञान व सरळ मार्गाची पुकार ऐकतात. पहिला प्रकार: तो ज्ञानी जो धर्माचं ज्ञान संपादन करणारा आहे, आपल्या ज्ञानावर आचरण करणारा आहे, व ईतरांना शिक्षीत करणारा, त्या सुपीक जमीनी सारखा आहे, जिने पाणी शोषुन घेतले, स्वतः फायदा घेतला, व वनस्पती व फळफळावळे उगवले, सर्वांना फायदाच दिला. दुसरा प्रकार: तो व्यक्ती जो ज्ञान आपल्या कडे जमा करुन ठेवतो, परंतु ज्ञानाच्या खोलावर व निष्कर्षा पर्यंत तो पोहचु शकत नाही, तो ज्ञानाला जमा करून ठेवणारा आहे, आपला वेळ लावतो, परंतु स्वतः मात्र भलाई चे काम करत नाही, आपल्या ज्ञानाचे महत्व जाणत नाही, तो ईतरांना ज्ञानाचं दार उघडतो, तो त्या जमीनीसारखा आहे, ज्यात पाणी जमा राहते, व लोकं त्यापासुन फायदा उचलतात. तिसरा प्रकार: हा व्यक्ती ज्ञान तर घेतो परंतु पाठ करत नाही, व त्यावर आचरण करत नाही, तसेच दुसऱ्या पर्यंत पोहचवित नाही, तो त्या ओसाड व सपाट जमीनी सारखा आहे, ज्यावर एकही वनस्पती उगवत नाही, ना पाणी जमा करते, कधी कधी तर दुसऱ्यांना नुकसान सुद्धा पोहचविते.