विशेष वर्गीकरण: Virtues and Manners . Heart-Softeners and Sermons . Condemning Sins .

عَنْ أَنَسِ بْنِ مَالِكٍ رَضيَ اللهُ عنه قَالَ: قَالَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«لَمَّا عُرِجَ بِي مَرَرْتُ بِقَوْمٍ لَهُمْ أَظْفَارٌ مِنْ نُحَاسٍ يَخْمُشُونَ بها وُجُوهَهُمْ وَصُدُورَهُمْ، فَقُلْتُ: مَنْ هَؤُلَاءِ يَا جِبْرِيلُ، قَالَ: هَؤُلَاءِ الَّذِينَ يَأْكُلُونَ لُحُومَ النَّاسِ، وَيَقَعُونَ فِي أَعْرَاضِهِمْ».

[حسن] - [رواه أبو داود] - [سنن أبي داود: 4878]
المزيــد ...

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

अनस बिन मालीक रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:
<<जेव्हा मला मेअराज [साक्षात नरक व स्वर्गाचं दर्शन] झाली तेव्हा मला काही असे लोक दिसले ज्यांचे नखे तांब्याचे व ते स्वतःचे तोंड व छाती ला फाडत होते, मी विचारले:हे जिब्राईल, हे कोण लोक आहेत? हे ते लोकं आहेत, जे माणसाचं मांस [इतरांची निंदा करतात]खातात, व त्यांच्या सन्मानाची खेळत असत>>.

[حسن] - [رواه أبو داود] - [سنن أبي داود - 4878]

स्पष्टीकरण

प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी सांगितले की: जेव्हा त्यांना मेअराज [स्वर्ग व नरका चे साक्षात दर्शन करण्यात आले] तेव्हा त्यांचा सामना अशा लोकांशी झाला, ज्यांची नखे तांब्याचे, ते त्या नखांनी आपलेच चेहरा व छाती अक्षरश लचक्याने तोडत होते, प्रेषितांनी जिब्राईल ला विचारले की हे कोण लोक आहेत व त्यांच्या सोबत ही वर्तणुक का होत आहे? जीब्राईल अलैसलाम उत्तरले की:हे लोकं दुसऱ्यांची निंदा नालस्ती करीत व लोकांचे मान सन्मानाची चेष्टा करीत असत.

हदिसचे फायदे

  1. निंदा नालस्ती करण्यापासुन सक्तीने मनाई करण्यात आली आहे, निंदा करणाऱ्याची तुलना माणसाचे मांस खाणाऱ्या सोबत करण्यात आली आहे.
  2. लोकांच्या पाठीमागे त्यांच्या सन्मानावर व प्रतिष्ठेवर हल्ला व निंदा करणे, हे सर्व मोठ्या पापांमधे मोडते.
  3. तीबी रहमतुल्लाह सांगतात की:सदर हदिस मधे "यखमिशुन", चा अर्थ आहे, "लचका तोडणे". यावर स्पष्टीकरण देताना म्हणतात की: स्वतःच्या चेहऱ्यावर व छातीवर आपल्या हाताने मारणे व लचका तोडणे, हे क्रुत्य महिलांचे आहे, पुरुषांनी असले क्रुत्य करण्याची प्रथा नाही, म्हणुनच निंदा करणे व मुसलमानांची सन्मान व प्रतिष्ठेवर हल्ला करणे, या गुनाह व पाप करीता अशी सजा देण्यात आली आहे, याद्वारे सिद्ध होते की असे आचरण पुरुषांचे असु शकत नाही, ते फक्त महिलांनाच शोभनीय क्रुत्य आहे.
  4. अद्रुष्य गोष्टी वर विश्वास ठेवणे व त्या सर्व गोष्टी वर विश्वास ठेवणे जे अल्लाह व प्रेषित मुहम्मद [ अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर]नी सांगितली आहेत, अनिवार्य बाबी आहेत.
भाषांतरे दाखवा
भाषा: الإنجليزية الأوردية الإسبانية अधिक (36)
अधिक