विशेष वर्गीकरण: Jurisprudence and Juristic Principles . Family Jurisprudence . Muslim Society .

عَنْ أَبِي الدَّرْدَاءِ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ: قَالَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«أَلاَ أُخْبِرُكُمْ بِأَفْضَلَ مِنْ دَرَجَةِ الصِّيَامِ وَالصَّلاَةِ وَالصَّدَقَةِ؟» قَالُوا: بَلَى، قَالَ: «صَلاَحُ ذَاتِ البَيْنِ، فَإِنَّ فَسَادَ ذَاتِ البَيْنِ هِيَ الحَالِقَةُ».

[صحيح] - [رواه أبو داود والترمذي] - [سنن الترمذي: 2509]
المزيــد ...

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

हजरत अबु दरदा रजिअल्लाहु अनहु कथन करतात की प्रेषितांनी स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम फरमाविले आहे की:
<<काय मी तुम्हाला रोजा, नमाज, आणी दानधर्मा पेक्षा चांगले सत्कर्म न सांगु?>> सहाबा रजिअल्लाहु अनहु उत्तरले:का नाही! हे प्रेषिता! प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम फरमाविले:<<लोकांच्या दरम्यान समेट घडवुन आणणे, कारण आपसा-आपसातील मतभेदांमुळे एकप्रकारे संबंधाचे मुंडणच होते>>.

[صحيح] - [رواه أبو داود والترمذي] - [سنن الترمذي - 2509]

स्पष्टीकरण

पैगंबरांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या सोबत्यांना प्रश्नाद्वारे विचारणा केली:काय मी तुम्हांला रोजा, नमाज, व दानधर्म या नफली (शिल्लक) उपासने पेक्षा जास्त मोठे सत्कर्म न दाखवु? जेव्हा सगळ्यांनी मोठ्या उत्कंठेने होकार दिला. तेव्हा प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम स्पष्ट केले: लोकांच्या दरम्यान समेट (सुलह) घडवून आणने, सर्वात उच्चतम सत्कर्म आहे, कारण आप-आपसातील वादविवाद, भांडणामुळे, द्वेष, मत्सर व मानवा मानवात दरी निर्माण होते, आणी आपापसातील मतभेद, संबंधाची खराबी त्यांच्या दिन धर्म, दोघांनाही नुकसान पोहचवत, ज्याप्रमाणे वस्तरा केसांना मुळासकट समुळ (नष्ट) मुंडन करतो, म्हणुनच प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम याला मुंडन करणारं कर्म म्हटले आहे, अर्थात यामुळे माणसाचा दिनधर्मच मुळासकट समाप्त होतो.

हदिसचे फायदे

  1. प्रेषितांची सल्लल्लाहु अलैही व सल्लम प्रश्न विचारुन सहाबांना प्रशिक्षित करण्याची पद्धत, जेणेकरून त्यांच्या मध्ये ज्ञान संपादन करण्याची उत्कंठा निर्माण व्हावी.
  2. तीबी रहमतुल्लाह म्हणतात: लोकांमधील परस्पर संबंध सुधारण्याबाबत प्रोत्साहन आणि त्याची ताकीद करण्यात आली आहे, तसेच त्यात बिघाड निर्माण करण्यापासून दूर राहण्याची शिकवण देण्यात आली आहे; कारण परस्पर सलोखा आणि सुधारणा ही अल्लाहच्या दोरीला (धर्माला) घट्ट धरून ठेवण्याचे आणि मुसलमानांमध्ये फूट पडू न देण्याचे कारण ठरते, आणि परस्पर संबंध बिघडवणे हे धर्मात एक मोठी भेग (हानी) आहे, त्यामुळे जो कोणी लोकांमधील सलोखा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आणि मतभेद दूर करतो, त्याला असा दर्जा मिळतो जो फक्त स्वतःच्या इबादतीत मग्न राहून रोजा ठेवणाऱ्या आणि रात्री नमाज पढणाऱ्या व्यक्तीपेक्षाही अधिक उच्च असतो.
भाषांतरे दाखवा
भाषा: الإنجليزية الأوردية الإندونيسية अधिक (28)
अधिक