عَنْ عُمَرَ بْنِ الخَطَّابِ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ:
قَدِمَ عَلَى النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ سَبْيٌ، فَإِذَا امْرَأَةٌ مِنَ السَّبْيِ قَدْ تَحْلُبُ ثَدْيَهَا تَسْقِي، إِذَا وَجَدَتْ صَبِيًّا فِي السَّبْيِ أَخَذَتْهُ، فَأَلْصَقَتْهُ بِبَطْنِهَا وَأَرْضَعَتْهُ، فَقَالَ لَنَا النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ: «أَتُرَوْنَ هَذِهِ طَارِحَةً وَلَدَهَا فِي النَّارِ؟» قُلْنَا: لاَ، وَهِيَ تَقْدِرُ عَلَى أَلَّا تَطْرَحَهُ، فَقَالَ: «لَلَّهُ أَرْحَمُ بِعِبَادِهِ مِنْ هَذِهِ بِوَلَدِهَا».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 5999]
المزيــد ...
उमर बिन खत्ताब अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की:
प्रेषितांकडे अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर काही हवाजन चे कैदी आणल्या गेले, त्यामध्ये एक महिला होती, जी आपल्या बाळाचा कसुन शोध घेत होती, जेव्हा तिला बाळ दिसला तर ती त्याला आपल्या छातीला कवटाळत असे, व दुध पाजत असे, परंतु जेव्हा तिला तिचं बाळ भेटलं तेव्हा तिने त्याला काखेत घेतले व दुध पाजले,
या द्रुष्याला बघुन प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आपल्या सहाबांना विचारले की:<<तुम्हाला काय वाटते, हि महिला आपल्या बाळाला आगीत फेकुन देईल?>>
सहाबा म्हणाले:नाही, कदापी शक्य नाही! जर तीची फेकण्याची ताकत असली तरी शक्यच नाही,
त्यावर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की:<<अल्लाह आपल्या दासांवर, त्या महिला पेक्षा जास्त दयाळु व क्रुपावंत आहे>>.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 5999]
प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर हवाजिन चे कैदी आणण्यात आले असता त्यात एक महिला होती, जी आपल्या बाळाचा शोध घेत होती, तिला जे बाळ दिसत असे, ति त्याला उचलुन घेत असे, व त्याला दुध पाजत असे, कारण तिच्या छातीत दुध जमा झाल्यामुळे तिला त्रास होत होता, मग तिला तिचा बाळ दिसुन आलं, तिने त्याला उचलुन घेतले, आपल्या पोटाला चिमटुन घेतले व दुध पाजले, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आपल्या सोबत्यांना यावर प्रश्न केला की: तुम्हाला काय वाटते कि ही महिला आपल्या बाळाला आगीत फेकुन देणे पसंत करील? सोबती म्हणाले:नाही ती कदापिही आपल्या बाळाला आगीत फेकणे पसंद करणार नाही. प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की:अल्लाह आपल्या ईमानधारक दासांवर त्या महिलेच्या आपल्या बाळावरील दयेपेक्षा जास्त दयाळु व क्रुपाळु आहे.