विशेष वर्गीकरण: Virtues and Manners . Jurisprudence of Ethics . Praiseworthy Morals .

عَنْ عِيَاضِ بْنِ حِمَارٍ أَخِي بَنِي مُجَاشِعٍ رَضيَ اللهُ عنه قَالَ: قَامَ فِينَا رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ ذَاتَ يَوْمٍ خَطِيبًا، فَقَالَ: وَسَاقَ الْحَدِيثَ وَفِيهِ:
«وَإِنَّ اللهَ أَوْحَى إِلَيَّ أَنْ تَوَاضَعُوا حَتَّى لَا يَفْخَرَ أَحَدٌ عَلَى أَحَدٍ، وَلَا يَبْغِي أَحَدٌ عَلَى أَحَدٍ».

[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 2865]
المزيــد ...

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

अयाज बिन हिमार रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:
<<सर्वोच्च अल्लाह ने माझ्याकडे दिव्य वाणी केली की नम्रता अंगीकारावी, तुमच्यापैकी कुणीच एक दुसऱ्यावर अन्याय करु नये, व एक दुसऱ्यावर अहंकार करू नये>>.

[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 2865]

स्पष्टीकरण

हा संदेश प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी सोबत्यासमोर सादर केला, संदेश असा आहे की: निसंकोच अल्लाह ने माझ्याकडे दिव्य वाणी पाठविली, लोकांवर अनिवार्य आहे की एकमेकांसोबत नम्रतेने वागावे, म्हणजे एकमेकांसाठी आपली मने सौम्य व मने नम्रतेने झुकलेले असावे, कुणी व्यक्ती आपल्या उच्च खानदान व आपल्या संपत्ती मुळे घमेंडीने वागु नये, व एकमेकांवर अत्याचार करु नये.

हदिसचे फायदे

  1. सदर हदिस मधे नम्रा अंगीकारण्याची शीकवण देण्यात आली आहे, तसेच अहंकार व‌ गर्व चा निषेध केला आहे, लोकांना मोठेपणा दाखवणे मनाई प्राप्त आहे.
  2. अन्याय व अत्याचार तसेच घमेंडीपणा व अहंकार ला लगाम घातला आहे.
  3. अल्लाह खातर नम्रता दोन प्रकार ची असु शकते: पहिला प्रकार असा की व्यक्ती ने इस्लाम समोर नतमस्तक व्हावे, धर्मा विरुद्ध अक्कडपणा बाळगु नये, ईस्लाम च्या शिकवणी चे पालन‌ करतांना स्वताला मोठे समजु नये, दुसरा प्रकार:मानवाने सर्वच मानवजाती सोबत नम्रता व सौम्यतेने वागावे, अशी वागणुक कुठल्याच भितीपोटी नको व कुठल्याच फायद्यासाठी नको, तर फक्त आणी फक्त अल्लाह च्या मर्जी करता असावी.
भाषांतरे दाखवा
भाषा: الإنجليزية الأوردية الإسبانية अधिक (35)
अधिक