عَنْ عَائِشَةَ أُمِّ المؤْمِنين رَضيَ اللهُ عنها قَالَتْ:
جَاءَتْنِي مِسْكِينَةٌ تَحْمِلُ ابْنَتَيْنِ لَهَا، فَأَطْعَمْتُهَا ثَلَاثَ تَمَرَاتٍ، فَأَعْطَتْ كُلَّ وَاحِدَةٍ مِنْهُمَا تَمْرَةً، وَرَفَعَتْ إِلَى فِيهَا تَمْرَةً لِتَأْكُلَهَا، فَاسْتَطْعَمَتْهَا ابْنَتَاهَا، فَشَقَّتِ التَّمْرَةَ الَّتِي كَانَتْ تُرِيدُ أَنْ تَأْكُلَهَا بَيْنَهُمَا، فَأَعْجَبَنِي شَأْنُهَا، فَذَكَرْتُ الَّذِي صَنَعَتْ لِرَسُولِ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ، فَقَالَ: «إِنَّ اللهَ قَدْ أَوْجَبَ لَهَا بِهَا الْجَنَّةَ، أَوْ أَعْتَقَهَا بِهَا مِنَ النَّارِ».
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 2630]
المزيــد ...
मा आईशा रजिअल्लाहुअनहा वर्णन करते की:
एक माझ्या घरी एक गरीब बाई आली, जिच्या काखेत दोन मुली होत्या, मी तिला खाण्या करता तिन खजुरी दिल्या, त्या बाई ने दोन मुलींना एक एक खजुर दिली, व उरलेली खजुर खाण्यासाठी उचलली, तेवढ्यात दोन्ही मुलींनी पुन्हा आईला ती खजुर मागीतली, ती खजुर जी स्वतःती खाणार होती,त्या आईने त्या एका खजुर चे दोन भाग केले व दोन्ही मुलींना अर्धी अर्धी वाटुन दिली, मा आईशा म्हणते मला त्या आईच्या त्या क्रुत्याने खुपच प्रभावित केले, मी हा सर्व व्रुत्तांत प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम ना सविस्तर सांगितला, त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लमांनी फरमावीले की<< अल्लाह तआला ने या क्रुत्यामुळे तिच्या करता स्वर्ग /जन्नत अनिवार्य केले.
,व तिला नरका पासुन मुक्त केले>>.
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 2630]
आईशा रजिअल्लाहु अनहा आवर्जून सांगते की, माझ्याकडे एक गरीब स्त्री,दोन मुलींना काखेत घेउन आली, तिला त्यांनी दोन खजुरं दिल्या, त्या बाई ने एक खजुर एका मुलीला व दुसरी खजुर दुसऱ्या मुलीला दिली, मग तिने तिसरी खजुर स्वतः खाण्यासाठी उचलली व तोंडा कडे नेली असता,त्या दोन्ही मुलींनी आईला परत खजुर मागीतली, म्हणजे त्या मुली खजुर ला बघत होत्या,जिला आईने खाण्या करता घेतली होती, मग त्या आईने काहीच खाल्ले नाही, उलट त्या एका खजुर चे दोन तुकडे केले व दोघींना समान अर्धी अर्धी वाटुन दिली, म्हणजे प्रत्येक मुलीने दिड खजुर खाल्ली व आईने काहिच खाल्ले नाही, हा सारा व्रुत्तांत आईशा रजिअल्ला अनहा नी प्रेषितांना {सल्लल्लाहु अलैही व सल्लम} सांगितला व त्या आईने जे काही केले ते सर्व त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी आईशा रजिअल्ला अनहा ना सांगीतले की: सर्वोच्च अल्लाह ने तिच्या या कर्मामुळे जन्नत तिच्यावर अनिवार्य केली.व तिला नरका पासुन मुक्त केले.