عَنْ ابنِ عُمَرَ رَضيَ اللهُ عنهما عَنْ رَسُولِ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«مَنِ اقْتَنَى كَلْبًا إِلَّا كَلْبَ ضَارٍ أَوْ مَاشِيَةٍ نَقَصَ مِنْ عَمَلِهِ كُلَّ يَوْمٍ قِيرَاطَانِ»، قَالَ سَالِمٌ: وَكَانَ أَبُو هُرَيْرَةَ يَقُولُ: «أَوْ كَلْبَ حَرْثٍ»، وَكَانَ صَاحِبَ حَرْثٍ.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم: 1574]
المزيــد ...
इब्न उमर (रज़ी अल्लाहु अन्हुमा) यांनी सांगितले आहे की, रसूलुल्लाह ﷺ म्हणाले:
रसूल अक्रम म्हणाले:
"जो कोणी शिकारी कुत्रा किंवा जनावरांच्या रखवालीसाठी कुत्रा ठेवण्याव्यतिरिक्त दुसरे कुठलेही कुत्रे पाळतो, त्याच्या सत्कर्मांमधून दररोज दोन किरात (म्हणजे मोठा हिस्सा) कमी केला जातो."
सालिम (रहिमाहुल्लाह) म्हणतात:
अबू हुरैरा (रज़ी अल्लाहु अन्हु) म्हणायचे: "किंवा शेतीच्या राखणासाठी कुत्रा," आणि ते स्वतः शेतकरी होते.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم - 1574]
नबी ﷺ यांनी कुत्रे पाळण्याबद्दल इशारा दिला आहे — फक्त शिकार, जनावरांची किंवा शेतीची राखण करण्यासाठीच कुत्रा ठेवणे योग्य आहे. जो व्यक्ती या कारणांशिवाय कुत्रा पाळतो, त्याच्या सत्कर्मांच्या थोरपणातून (फळातून) दररोज दोन किरात (अल्लाह तआलाकडे ठरवलेले एक माप) कमी केले जाते.