عَنْ عَبْدِ اللَّهِ بْنِ عُمَرَ رَضيَ اللهُ عنهما:
سَأَلَ رَجُلٌ النَّبِيَّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ وَهُوَ عَلَى المِنْبَرِ، مَا تَرَى فِي صَلاَةِ اللَّيْلِ، قَالَ: «مَثْنَى مَثْنَى، فَإِذَا خَشِيَ الصُّبْحَ صَلَّى وَاحِدَةً، فَأَوْتَرَتْ لَهُ مَا صَلَّى» وَإِنَّهُ كَانَ يَقُولُ: «اجْعَلُوا آخِرَ صَلاَتِكُمْ وِتْرًا» فَإِنَّ النَّبِيَّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ أَمَرَ بِهِ.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 472]
المزيــد ...
हजरत अब्दुल्ला बिन उमर रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की:
जेव्हा प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर मेंम्बरवर लोकांना संबोधित करत होते, त्यावेळी एका व्यक्तीने प्रश्न केला की, रात्री च्या नमाज बाबत तुमचं काय मत आहे,
त्यावर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की:<<दोन दोन रकाअत ने नमाज अदा करा, आणी जर तुम्हाला सकाळ ची शंका वाटली तर एक रकाअत अदा करावी, ती एक रकाअत तुमच्या सर्व नमाज ला वितर (विषम) बनवते>>
प्रेषित सलामती असो त्यांच्यावर सांगत असत की:<<आपल्या रात्रीची शेवटची नमाज वितर ला बनवा>>
कारण प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर तसा आदेश दिला आहे.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 472]
एका व्यक्तीने प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर मेंम्बरवर असतांना सवाल केला, हे अल्लाह च्या प्रेषिता मला रात्री ला नमाज अदा करण्याची पद्धत सांगा? त्यावर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले:तुम्ही दोन दोन रकाअत नमाज अदा करावे, दर दोन रकाअत वर सलाम करावा, जर तुम्हाला दिवस उजाडण्याची भिती कसली तर मात्र तुम्ही एक रकाअत नमाज अदा करावी, ती तुमच्या सर्व नमाज ला वितर (विषम) बनवुन देईल, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर नेहमी सांगत असत की तुमची रात्र ची शेवटची नमाज वितर असावी.