विशेष वर्गीकरण: The Creed . Belief in the Last Day . The Hereafter Life .

عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ أَنَّ النَّبِيَّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ لِبِلاَلٍ عِنْدَ صَلاَةِ الفَجْرِ:
«يَا بِلاَلُ، حَدِّثْنِي بِأَرْجَى عَمَلٍ عَمِلْتَهُ فِي الإِسْلاَمِ، فَإِنِّي سَمِعْتُ دَفَّ نَعْلَيْكَ بَيْنَ يَدَيَّ فِي الجَنَّةِ» قَالَ: مَا عَمِلْتُ عَمَلًا أَرْجَى عِنْدِي أَنِّي لَمْ أَتَطَهَّرْ طَهُورًا، فِي سَاعَةِ لَيْلٍ أَوْ نَهَارٍ، إِلَّا صَلَّيْتُ بِذَلِكَ الطُّهُورِ مَا كُتِبَ لِي أَنْ أُصَلِّيَ.

[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 1149]
المزيــد ...

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम सकाळच्या नमाज (फज्र) वेळी हजरत बिलाल रजिअल्लाहु अनहु ला विचारले की:
<< हे बिलाल, मला तुमच्या ईस्लाम मधील त्या क्रॄत्यांबद्दल सांगा, ज्याची तुम्हाला सर्वात जास्त सफलतेची आशा आहे, कारण मी (जन्नत) स्वर्गात तुमच्या बुटाचा आवाज माझ्या समोरा समोर ऐकला आहे>>, हजरत बिलाल रजिअल्लाहु अनहु म्हणाले: मी ईस्लाम मध्ये असे कोणतेही आचरण केले नाही, ज्या बद्दल मला यापेक्षा जास्त सफलतेची आशा असेल, मी दिवसा रात्री तुन फक्त ज्या ज्या वेळी वुजु केला असेल, त्या त्या वेळी वुजु सोबतच मी अल्लाह करता नफिल नमाज अदा केली आहे, जेवढी माझ्या नशीबी होती.

[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 1149]

स्पष्टीकरण

प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम स्वप्नांमध्ये स्वताला (जन्नत) स्वर्गात बघितले, तेव्हा हजरत बिलाल बिन रबाह रजिअल्लाहु अनहु ना विचारले की: तुम्ही ईस्लाम मध्ये कोणते असे आचरण केले आहे, ज्याबाबत तुम्ही सर्वात जास्त आशावादी आहात? कारण मला (जन्नत) स्वर्गात चालतांना तुमच्या बुटाची चाहुल लागली. त्यावर हजरत बिलाल रजिअल्लाहु अनहु नि सांगितले की: मी जेव्हा कधि निर्वजु झालो, त्या त्या वेळी मी ताबडतोब वुजु पुर्ण केला, व लगेच वुजु सह अल्लाह खातर जेवढी नशीबी होती तेवढी नफिल नमाज अदा केली.

हदिसचे फायदे

  1. हजरत बिलाल रजिअल्लाहु अनहु नी वर्णन केलेल्या सत्कर्मा बाबत, अर्थात प्रत्येक वुजु नंतर नमाज अदा करणे, जे खुपच आशेने भरलेले सुंदर आचरण आहे, आणी जे (जन्नत) स्वर्गात प्रवेशाचे कारण बनते.
  2. प्रत्येक वुजु नंतर नमाज अदा करणे योग्य व सुंदर आचरण आहे.
  3. गुरुंचे आपल्या शिष्याला त्याच्या आचरणा बाबत विचारणा करणे योग्य आहे, कारण जर ते आचरण योग्य असेल तर त्यावर नियमीतता वर्तवण्याचे आदेश द्यावे, आणी जर क्रॄत्य अयोग्य असेल तर त्यावर तंबी करणे गरजेचे आहे.
  4. प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी हजरत बिलाल रज़ियल्लाहु अन्हु यांना दिलेली साक्ष की ते जन्नतवाल्यांपैकी आहेत.
  5. हा प्रश्न फज्रच्या नमाजच्या वेळी विचारला गेला होता, यात याकडे संकेत आहे की ही घटना प्रेषित सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या स्वप्नात घडली होती, आणि प्रेषितांची स्वप्ने सत्य असतात.
भाषांतरे दाखवा
भाषा: الإنجليزية الأوردية الإندونيسية अधिक (28)
अधिक