عَنْ بَهْزِ بْنِ حَكِيمٍ عَنْ أَبِيهِ عَنْ جَدِّهِ قَالَ:
قُلْتُ يَا رَسُولَ اللَّهِ: مَنْ أَبَرُّ؟ قَالَ: «أُمَّكَ، ثُمَّ أُمَّكَ، ثُمَّ أُمَّكَ، ثُمَّ أَبَاكَ، ثُمَّ الْأَقْرَبَ فَالْأَقْرَبَ».
[حسن] - [رواه أبو داود والترمذي وأحمد] - [سنن أبي داود: 5139]
المزيــد ...
बहज़ बिन हकीम यांचे वडील आणि त्यांचे आजोबा यांच्याकडून आलेले आहे की, त्यांनी सांगितले:
मी म्हणालो: हे रसूल अल्लाह ﷺ! सर्वांत जास्त सन्मान कोणाचा करावा?
त्यांनी उत्तर दिले: "तुझी आई, नंतर तुझी आई, नंतर तुझी आई, नंतर तुझा वडील, नंतर जवळच्या नात्यातील व्यक्ती, जवळच्या नात्यातील व्यक्ती."
[حسن] - [رواه أبو داود والترمذي وأحمد] - [سنن أبي داود - 5139]
नबी ﷺ यांनी स्पष्ट केले की सर्वात जास्त आदर, सद्गुणी वर्तन, चांगले व्यवहार, सौम्य संबंध आणि सहवास याचा अधिकारी व्यक्ती ही आई आहे. त्यांनी आईच्या हक्काचे महत्त्व तीन वेळा सांगितले, जेणेकरून तिची इतर सर्व लोकांपेक्षा अद्वितीय प्रतिष्ठा स्पष्ट होईल. यानंतर नबी ﷺ यांनी स्पष्ट केले की आईनंतर सर्वात जास्त आदर करण्याचा हक्क वडील आहे, त्यानंतर नातेवाईकांमध्ये जो सर्वात जवळचा असेल, आणि जितका जवळ असेल, तितकेच त्याच्याशी संबंध ठेवणे आणि सद्गुणी वर्तन करणे आवश्यक आहे.