عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رَضيَ اللهُ عنه قَالَ:
جَاءَ رَجُلٌ إِلَى رَسُولِ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ، فَقَالَ: يَا رَسُولَ اللهِ، أَرَأَيْتَ إِنْ جَاءَ رَجُلٌ يُرِيدُ أَخْذَ مَالِي؟ قَالَ: «فَلَا تُعْطِهِ مَالَكَ» قَالَ: أَرَأَيْتَ إِنْ قَاتَلَنِي؟ قَالَ: «قَاتِلْهُ» قَالَ: أَرَأَيْتَ إِنْ قَتَلَنِي؟ قَالَ: «فَأَنْتَ شَهِيدٌ»، قَالَ: أَرَأَيْتَ إِنْ قَتَلْتُهُ؟ قَالَ: «هُوَ فِي النَّارِ».
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 140]
المزيــد ...
अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु कथन वर्णन करतात की:
एक व्यक्ती प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम जवळ आला, विचारणा करु लागला की:हे अल्लाह च्या प्रेषिता [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर]! जर कुणी जबरदस्तीने माझा माल हिसकावुन घेतला तर मी काय करू? त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम उत्तरले की:<<तुम्ही तुमचा माल देता कामा नये>>त्याने पुन्हा प्रश्न केला की: जर त्याने माझ्यावर हल्ला केला तर? पैगंबर सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले: <<तुम्ही सुद्धा प्रतिकार करावा>> त्याने पुन्हा प्रश्न केला की,जर त्याने माझा खुन केला तर? त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम उत्तरले की अशा परिस्थितीत तर <<तुला शाहिद चा दर्जा मिळेल>>पण त्याने प्रतिप्रश्न केला की जर मी त्याचा खात्मा केला तर? प्रेषित [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] म्हणाले:<<मग तर तो नरकाच्या अग्नीत टाकल्या जाईल>>.
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 140]
प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम जवळ एक व्यक्ती आला, व म्हणाला की: हे,प्रेषिता! मला सांगा,जर कुणी नाहक माझी मालमत्ता हिसकावुन घेत असेल तर मी काय करू? प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी त्याला सांगितले की त्याला तुझी मालमत्ता देऊ नको पण त्याने विचारले की: जर त्याने माझ्याशी लढाई केली तर? त्यावर प्रेषित म्हणाले की तुम्ही प्रतिकार करा, त्याने पुन्हा विचारले की: जर तो वरचढ राहला वमला त्याने नाहक माझा जिव घेतला तर? प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले की तुम्हाला *शहिद* चा दर्जा मिळेल, पण त्याने पुन्हा विचारले की: जर मी त्याला मारले तर ? प्रेषित [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] म्हणाले की तो व्यक्ती ठराविक काळासाठी नरकात टाकल्या जाईल.