विशेष वर्गीकरण: Virtues and Manners . Virtues . Merits of the Companions .

عَنْ أَنَسِ بْنِ مَالِكٍ رَضيَ اللهُ عنه قَالَ:
كَانَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَدْخُلُ الْخَلَاءَ، فَأَحْمِلُ أَنَا وَغُلَامٌ نَحْوِي إِدَاوَةً مِنْ مَاءٍ وَعَنَزَةً فَيَسْتَنْجِي بِالْمَاءِ.

[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم: 271]
المزيــد ...

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

अनस बिन मालीक रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की:
प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम जेव्हा शौच करता जात असत तेव्हा मी व अजुन एक मुलगा त्यांच्याकरता पाणी व भाला सोबत आणत होतो, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम पाण्याने स्वच्छता करत होते.

[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم - 271]

स्पष्टीकरण

प्रेषितांचे खास सेवक अनस बिन मालीक रजिअल्लाहु अनहु वर्णन सांगत आहेत, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम जेव्हा शौच‌‌‌ करता दुर जात होते , तेव्हा मी व एक मुलगा प्रेषितांना शुद्धते साठी पाणी सोबत आणत होतो, त्याने प्रेषित स्वच्छ होतं असत, ते पाणी चामड्याने बनवलेल्या भांड्यात असे, तसेच प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम शौचा करता, गर्दीपासून दुर जात असत, तसेच सोबतच एक भाला असलेली काठी असे,त्यावर कपडा टाकुन ते पडदा करत असत, तसेच त्या भाल्याचा वापर *सुतरा* [नमाज अदा करत असतांना समोर उभी करतात] म्हणुन करत, तसेच त्या भांड्याचा वापर ईतर शुद्धतेसाठी सुद्धा करायचे.

हदिसचे फायदे

  1. एका मुसलमानाला ला जरुरी आहे की शौचाकरता व शुद्धतेकरता पाणी सोबत ठेवावे, अन्यथा उभे राहुन पाणी घेतले असता घाण लागु शकते.
  2. शौच करतांना आपल्या गुप्तांगांना लपवणे जरुरी आहे, अन्य कुणी बघु नये, गुप्तांग ईतरांनी बघणे हराम [मनास्पद] आहे, म्हणुनच प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम शौचं करत असतांना जमीनीवर एक काठी रोवत असत व‌ त्यावर एक चादर लटकवत, जेणेकरून कुणी बघु नये.
  3. बालकांना ईस्लामी आचरणाचे धडे देणे अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्यामुळे ते स्वतः सुसंस्कृत बनतील व ईतरांना सुद्धा बनवतील.
भाषांतरे दाखवा
भाषा: الإنجليزية الأوردية الإسبانية अधिक (35)
अधिक