عَنْ حُذَيْفَةَ رَضيَ اللهُ عنهُ عَنِ النَّبِيِّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ:
«إِنَّهَا سَتَكُونُ أُمَرَاءُ يَكْذِبُونَ وَيَظْلِمُونَ، فَمَنْ صَدَّقَهُمْ بِكَذِبِهِمْ وَأَعَانَهُمْ عَلَى ظُلْمِهِمْ فَلَيْسَ مِنَّي، وَلَسْتُ مِنْهُ، وَلَا يَرِدُ عَلَيَّ الْحَوْضَ، وَمَنْ لَمْ يُصَدِّقْهُمْ بِكَذِبِهِمْ وَلَمْ يُعِنْهُمْ عَلَى ظُلْمِهِمْ فَهُوَ مِنِّي، وَأَنَا مِنْهُ، وَسَيَرِدُ عَلَيَّ الْحَوْضَ».
[صحيح] - [رواه أحمد] - [مسند أحمد: 23260]
المزيــد ...
हुजैफा रजिअल्लाहु अन्हु यांनी सांगितले की, नबी ﷺ यांनी सांगितले:
“हे लोक सत्ताधारी होतील जे खोटे बोलतील आणि अन्याय करतील. जोही त्यांच्या खोटेपणावर विश्वास ठेवेल आणि त्यांच्या अन्यायात त्यांना मदत करेल, तो माझा नाही आणि मी त्याचा नाही , आणि तो माझ्या हौज (पवित्र तळ्या)कडे येणार नाही. आणि जोही त्यांच्या खोटेपणावर विश्वास ठेवणार नाही आणि त्यांच्या अन्यायात त्यांना मदत करणार नाही, तो माझा आहे आणि मी त्याचा आहे, आणि तो माझ्या हौजाकडे येईल.”
[صحيح] - [رواه أحمد] - [مسند أحمد - 23260]
नबी ﷺ यांनी सांगितले की, माझ्या मृत्यूनंतर लोकांवर असे सत्ताधारी येतील जे खोटे बोलतील आणि जे बोलतात ते करणार नाहीत, तसेच न्यायात अन्याय करतील.
जोही त्यांच्याकडे जाईल आणि त्यांच्या खोटेपणावर विश्वास ठेवेल, किंवा त्यांच्या अन्यायात त्यांना मदत करेल—किंवा त्यांच्या जवळ जाण्यासाठी किंवा त्यांच्या गोष्टींची आशा बाळगून—तो माझा नाही, मी त्याचा नाही, आणि कयामतच्या दिवशी तो माझ्या हौज कोउसऱकडे येणार नाही.
जोही त्यांच्याकडे जाणार नाही, त्यांच्या खोटेपणावर विश्वास ठेवणार नाही आणि त्यांच्या अन्यायात मदत करणार नाही, तो माझा आहे, मी त्याचा आहे, आणि कयामतच्या दिवशी तो माझ्या हौज कोउसऱकडे येईल.