عَنْ عُبَيْدِ اللَّهِ بْنِ عَدِيِّ بْنِ الخِيَارِ قَالَ:
أَخْبَرَنِي رَجُلَانِ أَنَّهُمَا أَتَيَا النَّبِيَّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ فِي حَجَّةِ الوَدَاعِ وَهُوَ يُقَسِّمُ الصَّدَقَةَ، فَسَأَلَاهُ مِنْهَا، فَرَفَّعَ فِينَا البَصَرَ وَخَفَّضَهُ، فَرَآنَا جَلْدَيْنِ، فَقَالَ: «إِنَّ شِئْتُمَا أَعْطَيْتُكُمَا، وَلَا حَظَّ فِيهَا لِغَنِيٍّ، وَلَا لِقَوِيٍّ مُكْتَسِبٍ».

[صحيح] - [رواه أبو داود والنسائي] - [سنن أبي داود: 1633]
المزيــد ...

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

हजरत ओबेदुल्राह बिन अदि बिन खय्यार रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की:
दोन व्यक्तिंनी मला एक घटना सांगितली की: ते दोघे प्रेषितांकडे अंतिम हज्जच्या प्रसंगी गेले असतांना, त्यावेळी प्रेषित दानाचे वाटप करत होते, त्या दोघांनी प्रेषातांसमोर दानाची भिक मागीतली, परंतु प्रेषातांनी त्या दोघांना निरक्षुण खाली वर बघितले, आम्हाला धष्टपुष्ट बघितले, त्यानंतर फरमाविले:<< माझ्या इच्छेने तुम्हाला दान देऊ शकतो, परंतु या दानधर्म च्या पुंजी वर धनवान व्यक्ती चा कुठलाही वाटा नाही, ना कुण्या धष्टपुष्ट व्यक्तीचा>>.

[صحيح] - [رواه أبو داود والنسائي] - [سنن أبي داود - 1633]

स्पष्टीकरण

हज्जतुल विदा च्या वेळी दोन व्यक्ती प्रेषातांकडे स.आली, तेव्हा प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम दानधर्माचे वाटप करत होते, त्यांनी त्यातुनच दानाची मागणी केली, प्रेषितांनी त्यांचे खुप बारकाईने निरीक्षण केले, कि खरोखर ते दोघे दानधर्माचे हकदार आहेत कि नाहीत? परंतु प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम ते सम्रॄद्ध व बलशाली आढळुन आले, त्यावर फरमाविले:मी तुम्हाला दानधर्मातुन वाटा देऊ शकतो परंतु दानधर्म त्या व्यक्तिंकरिता योग्य नाही, ज्याच्याजवळ पुरेसी संपत्ती आहे, आणी त्या व्यक्तीला सुद्धा योग्य नाही, जो शरिराने धष्टपुष्ट असेल, व मेहनत मजदुरीने आपला उदरनिर्वाह करु शकतो, भलेही तो संपत्तीवान नसेल.

हदिसचे फायदे

  1. धनवान व धष्टपुष्ट व्यक्तीने दानधर्म मागणे हराम म्हणजे अयोग़्य आहे.
  2. ज्या व्यक्तीची गरीबी किंवा श्रीमंती ज्ञात नसेल त्याला गरिब गणल्या जाईल, आणी तो दानधर्माचा वाटेकरी असेल.
  3. फक्त शरीर संपत्ती दानधर्मा पासुन वंचित करण्यास पुरेसी नाही, तर त्या करिता शरीरासोबत कमाईपुत असणे सुद्धा आवश्यक आहे.
  4. जो व्यक्ती आपल्या गरजा आपल्या कमाईने पुर्ण करु शकतो, त्याला फर्ज जकात ची रक्कम घेणे योग्य नाही; कारण तो कमाईमुळे स्वावलंबी आहे, ज्याप्रमाणे धनवान व्यक्ती संपत्ती मुळे स्वावलंबी आहे.
  5. सदर हदिस एका मुसलमाना बाबत पैगंबरांची उच्चतम संस्कार प्रदर्शित करते, स्वावलंबी, आत्मनिर्भरता, लोकांना वाटणाररा, भिक न मागणारा, ना कामचोर, ना सुस्त व‌ निष्काळजी.
भाषांतरे दाखवा
भाषा: الإنجليزية الأوردية الإندونيسية अधिक (28)
अधिक