عَنْ سَلْمَانَ الْفَارِسِيِّ رَضيَ اللهُ عنه قَالَ: قَالَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«ثَلَاثَةٌ لَا يُكَلِّمُهُمُ اللَّهُ يَوْمَ الْقِيَامَةِ وَلَا يُزَكِّيهِمْ وَلَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ: أُشَيْمِطٌ زَانٍ، وَعَائِلٌ مُسْتَكْبِرٌ، وَرَجُلٌ جَعَلَ اللَّهَ لَهُ بِضَاعَةً، فَلَا يَبِيعُ إِلَّا بِيَمِينِهِ وَلَا يَشْتَرِي إِلَّا بِيَمِينِهِ».
[صحيح] - [رواه الطبراني] - [المعجم الصغير: 821]
المزيــد ...
सलमान फारसी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर नी फरमाविले की:
<<तिन प्रकारच्या लोकं ज्यांच्याशी अल्लाह कयामत च्या दिवसी ना संभाषण करेल,ना त्यांना शुद्ध करेल, परंतु त्यांना वेदनादायी यातनामय नरक असेल:
वयोवृद्ध व्यभिचारी,
गर्वीष्ठ फकीर,
तो व्यक्ती ज्याला, अल्लाह ने व्यापार दिला, परंतु तो खरेदी विक्री च्या वेळी शपथा वर शपथा घालतो>>.
[صحيح] - [رواه الطبراني] - [المعجم الصغير - 821]
सदर हदिस मधे प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर तिन प्रकारच्या लोकांचा उल्लेख केला, ज्यांनी जर का अल्लाह कडे क्षमा मागितली नाही, किंवा अल्लाह ने जर त्यांना क्षमा केली नाही तर कयामत (हिशेबाच्या) च्या दिवसी अशा लोकांना वेदनादायी यातना भोगाव्या लागतील: पहिला:अल्लाह त्यांच्या सोबत संभाषण करणार नाही, अर्थात सर्वोच्च अल्लाह त्यांच्या वर नाराज असेल, त्यांच्याकडे दयेची नजर टाकणार नाही, किंवा त्यांच्याशी असा संवाद करेल की तो संवाद याच्या करता बेइज्जती चे द्योतक असेल. दुसरे: अल्लाह त्यांना शुद्ध करणार नाही, याचा अर्थ आहे, त्यांचे पाप क्षमा करणार नाही त्यांची स्तुती करणार नाही. तिसरे: यांना वेदनादायी यातना भोगाव्या लागतील, याचा अर्थ परलोकात कठोर व यातनादायी शिक्षा दिली जाईल. ते तिन लोक आहेत: पहिला वर्ग: वयस्कर व्यभिचारी तो व्यक्ती जो वयोवृद्ध झाला, त्याची वासना शक्ती कमजोर झाली, अशा अवस्थेत पापी व्रुत्ती कमी असावी, तरीही तो व्यभिचार करतो. दुसरा: गरीब पण गर्वीष्ठ ज्याच्या जवळ काहीच नाही, तरीही तो अहंकारी व गर्विष्ठ आहे, व ईतरांना निच्च समजतो. तिसरे: व्यापारी जो अल्लाह चं नावावर खोटं बोलतो हा व्यक्ती देवाण घेवाणात वारंवार अल्लाह ची शपथ घेतो, जेणेकरून लोकांचा विश्वास संपादन करावा, एकंदरीत हा अल्लाह च्या नावाचा वापर फक्त पैसा कमविण्यासाठी करतो.