عَنْ عِكْرِمَةَ:
أَنَّ عَلِيًّا رَضِيَ اللَّهُ عَنْهُ حَرَّقَ قَوْمًا، فَبَلَغَ ابْنَ عَبَّاسٍ فَقَالَ: لَوْ كُنْتُ أَنَا لَمْ أُحَرِّقْهُمْ لِأَنَّ النَّبِيَّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ قَالَ: «لاَ تُعَذِّبُوا بِعَذَابِ اللَّهِ»، وَلَقَتَلْتُهُمْ كَمَا قَالَ النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ: «مَنْ بَدَّلَ دِينَهُ فَاقْتُلُوهُ».
[صحيح] - [رواه البخاري] - [صحيح البخاري: 3017]
المزيــد ...
हजरत इक्रमा कथन करतात की:
हजरत अली अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर नि काही लोकांना सजा म्हणुन आगीत जाळले, सदर बातमी हजरत अब्दुल्ला बिन अब्बास पर्यंत पोहचली, त्यावर त्यांनी सांगितले की:जर त्यांच्या जागी मी असतो तर कदापिही अग्नीची सजा देत नव्हतो,
कारण प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:<<अल्लाह च्या शिक्षेने कुणालाही शिक्षा देऊ नका>>,
परंतु मी त्यांना जरुर ठार मारत होतो, ज्याप्रमाणे प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले:<< जो आपला धर्म बदलतो, त्याला ठार करा>>.
[صحيح] - [رواه البخاري] - [صحيح البخاري - 3017]
हजरत अली बिन अबी तालीब अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर यांनी काही जिंदीक म्हणजे धर्मद्रोही लोकांना, आपल्या ईज्तेहाद (तर्काने) आगीत जाळले, ही बातमी अब्दुल्ला बिन अब्बास अल्लाह राजी असो त्यांच्याशी कळाली असता, त्यांनी त्या लोकांना ठार मारण्याचे समर्थन केले, परंतु त्यांना जाळण्याचा तिव्र विरोध केला. त्यांनी सांगितले की: जर मी त्यांच्या जागी असतो तर कदापिही अग्नीची सजा दिली नसती;कारण प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर स्पष्टपणे आगीने कुणाला सजा देणे हे फक्त एकमेव अल्लाह करिता शोभनिय आहे, परंतु त्यांना ठार मारणे पुरेसे आहे, कारण प्रेषितांचं सलामती असो त्यांच्यावर फरमान आहे की:जो ईस्लाम ला सोडचिठ्ठी देऊन आपला धर्म बदलतो, त्याला ठार करा.