عَنْ مُعَاذَةَ قَالَتْ:
سَأَلْتُ عَائِشَةَ، فَقُلْتُ: مَا بَالُ الْحَائِضِ تَقْضِي الصَّوْمَ، وَلَا تَقْضِي الصَّلَاةَ؟ فَقَالَتْ: أَحَرُورِيَّةٌ أَنْتِ؟ قُلْتُ: لَسْتُ بِحَرُورِيَّةٍ، وَلَكِنِّي أَسْأَلُ. قَالَتْ: كَانَ يُصِيبُنَا ذَلِكَ، فَنُؤْمَرُ بِقَضَاءِ الصَّوْمِ، وَلَا نُؤْمَرُ بِقَضَاءِ الصَّلَاةِ.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم: 335]
المزيــد ...
मुआजाह रजिअल्लाहु अनहा वर्णन करतात की:
मी आई आईशा रजिअल्ला अनहा ला एकदा प्रश्न केला की, मासीक पाळी मुळे सुटलेले उपवास ची भरपाई द्यावी लागते, म्हणजे पुन्हा ठेवावे लागतात, परंतु त्या काळात सुटलेली नमाजपुन्हा अदा करण्याची गरज नाही असे का बरं?
आई आईशा रजिअल्ला अनहा उत्तरली, तुम्ही हरूरीया पंथा पैकी तर नाही?
मी म्हणालो, नाही मी हरूरीया पैकी नाहीच!
फक्त प्रश्न केला आहे, त्यावर आईशा रजिअल्ला अनहा म्हणाली: आम्हाला मासीक पाळी यायची, व आम्हाला उपवास पुन्हा ठेवण्याचा आदेश दिला जायचा, परंतु नमाज ला पुनश्च अदा करण्याचा आदेश नव्हता.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم - 335]
एकदा मआजत रजिअल्ला अनहा माई आईशा रजिअल्ला अनहा कडे प्रश्न करत म्हणाली:की कोणतं कारण आहे ज्यामुळे ऊपवासाची [पुर्ण करणे]कजा अनिवार्य करण्यात आली जे उपवास ती ठेउ शकली नाही तसेच मासीक पाळी दरम्यान सुटलेल्या नमाज ची कजा [पुन्हा] अनिवार्य केली नाही? माई आईशा रजिअल्ला अनहा म्हणाली की:तु हरुरीया म्हणजे काय तु सुध्दा तशी श्रद्धा ठेवते जसे ते ठेवतात? व तुला तशी कठीणता हवी आहे का धर्मात? त्या उत्तरल्या: मी हरुरीया पैकी नाही, माई आईशा रजिअल्ला अनहा म्हणाली की:प्रेषितांच्या काळात मासीक पाळी आली असता,व त्या काळात आम्ही नमाज व रोजा ऊपवास सोडुन देणं होतो, प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम आम्हाला रोजा ची कजा [पुन्हा] चा आदेश देत असत, परंतु नमाज पुन्हा अदा करण्याचा आदेश देत नव्हते.