عَنْ أَبِي بَكْرٍ الصِّدِّيقَ رَضيَ اللهُ عنه قَالَ:
نَظَرْتُ إِلَى أَقْدَامِ الْمُشْرِكِينَ عَلَى رُءُوسِنَا وَنَحْنُ فِي الْغَارِ، فَقُلْتُ: يَا رَسُولَ اللهِ لَوْ أَنَّ أَحَدَهُمْ نَظَرَ إِلَى قَدَمَيْهِ أَبْصَرَنَا تَحْتَ قَدَمَيْهِ، فَقَالَ: «يَا أَبَا بَكْرٍ، مَا ظَنُّكَ بِاثْنَيْنِ اللهُ ثَالِثُهُمَا».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم: 2381]
المزيــد ...
हजरत अबू बकर सिद्दीक (रजि.) यांच्याकडून असे सांगितले आहे की, त्यांनी म्हटले:
आम्ही गुहेत असताना मला आमच्या डोक्यावर मुश्किरींची पावले दिसली. मी म्हणालो, "हे रसूलल्लाह! जर त्यांच्यापैकी कोणी त्याच्या पावलांकडे पाहिले तर तो आम्हाला पाहील." त्यांनी म्हटले: "हे अबू बकर! अल्लाह तिसरा असताना दोघांबद्दल तुमचा काय विश्वास आहे?"
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم - 2381]
अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक (रा.) हिजरतच्या वेळी म्हणाले: मी पाहिले की मुश्किरींचे पाय आमच्या डोक्यावर गुहेच्या वर उभे होते आणि आम्ही त्यात होतो. मी म्हणालो, हे रसूलल्लाह! जर त्यांच्यापैकी कोणी त्याच्या पायांकडे पाहिले तर तो आपल्याला पाहील. ते म्हणाले: हे अबू बकर! जेव्हा अल्लाह तिसरा आहे ज्यांच्याकडे आधार, मदत, संरक्षण आणि मार्गदर्शन आहे तेव्हा तुम्हाला दोघांबद्दल काय वाटते?!