عَنْ أَبِي العَبَّاسِ، عَبْدِ الله بْنِ عَبَّاسٍ رَضِيَ اللَّهُ عَنْهُمَا قَالَ: كُنْت خَلْفَ رَسُولِ اللَّهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَوْمًا، فَقَالَ:
«يَا غُلَامِ! إنِّي أُعَلِّمُك كَلِمَاتٍ: احْفَظِ اللَّهَ يَحْفَظْكَ، احْفَظِ الله تَجِدْهُ تُجَاهَكَ، إذَا سَأَلْتَ فَاسْأَلِ اللهَ، وَإِذَا اسْتَعَنْتَ فَاسْتَعِنْ بِاَللهِ، وَاعْلَمْ أَنَّ الأُمَّةَ لَوْ اجْتَمَعَتْ عَلَى أَنْ يَنْفَعُوكَ بِشَيْءٍ لَمْ يَنْفَعُوكَ إلَّا بِشَيْءٍ قَدْ كَتَبَهُ اللَّهُ لَكَ، وَإِنِ اجْتَمَعُوا عَلَى أَنْ يَضُرُّوكَ بِشَيْءٍ لَمْ يَضُرُّوكَ إلَّا بِشَيْءٍ قَدْ كَتَبَهُ اللَّهُ عَلَيْكَ؛ رُفِعَتِ الأَقْلَامُ، وَجَفَّتِ الصُّحُفُ».
وَفِي رِوَايَةِ غَيْرِ التِّرْمِذِيِّ: «احْفَظِ اللهَ تَجِدْهُ أَمَامَكَ، تَعَرَّفْ إلَى اللهِ فِي الرَّخَاءِ يَعْرِفْكَ فِي الشِّدَّةِ، وَاعْلَمْ أَنَّ مَا أَخْطَأَكَ لَمْ يَكُنْ لِيُصِيبَكَ، وَمَا أَصَابَك لَمْ يَكُنْ لِيُخْطِئَكَ، وَاعْلَمْ أَنَّ النَّصْرَ مَعَ الصَّبْرِ، وَأَنْ الفَرَجَ مَعَ الكَرْبِ، وَأَنَّ مَعَ العُسْرِ يُسْرًا».
[صحيح] - [رواه الترمذي وغيره] - [الأربعون النووية: 19]
المزيــد ...
अब्दुल्ला बिन अब्बास रजिअल्लाहु अनहु कथन करतात की:एका दिवसी मी प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर संगतीत सवारी करत असतांना प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की:
<<ए बालका! मी तुजला काही शब्द मंत्र शीकवितो:अल्लाह चे रक्षण कर, अल्लाह तुझे रक्षण करीन, अल्लाह च्या आज्ञेचे पालन कर, अल्लाह तुझ्या सोबत असेन, जेव्हा केव्हा काही मागायचे असल्यास, फक्त आणी फक्त अल्लाह कडेच माग! काही गरज असल्यास अल्लाह समोर मांड,आणी जाणुन घ्या कि समस्त मानवजात तुम्हाला फायदा पोहचविण्यासाठी जमा झाली,तरी फक्त तेवढाच फायदा पोहचवु शकेल,जेवढा अल्लाह ने तुमच्या नशिबात लिहुन ठेवला आहे, आणी जर सर्वांनी तुमचं नुकसान करु इच्छीले तरीही ते फक्त तेवढच नुकसान पोहचवु शकतील जेवढं अल्लाह ने लिहुन ठेवले आहे; लेखनी उचलुन ठेवल्या आहेत,व पुस्तकं लिखाण जुनी पुराणी झाली>>.
[صحيح] - [رواه الترمذي وغيره] - [الأربعون النووية - 19]
इब्ने अब्बास अल्लाह प्रसन्न असो वर्णन करतात की ते बालपणात असतांना, प्रेषितांसमवेत अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर उंटस्वारी असतांना, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की:मी तुम्हाला काही तत्व शीकवितो,जे तुम्हाला जिवनात उपयोगी असतील: अल्लाह चे रक्षण करा अर्थात तुम्ही अल्लाह च्या आदेशाचे पालन करा, त्याने मना केलेल्या कामा पासुन दुर रहा, सत्कर्मात व्यस्त राहा, जेव्हा मानव सत्कर्मात व आज्ञापालन करत राहतो, तर अल्लाह त्याचे रक्षण करतो, जगातील संकटावेळी व परलोकाच्या संकटातून सुद्धा आपल्या दासाची मदत करत असतो, जेव्हा काही गरज भासल्यास फक्त अल्लाह कडेच धाव घ्यावी, कारण खराखुरा दाता फक्त आणि फक्त एकमेव अल्लाहच आहे. कोणतीही मदत भासल्यास फक्त अल्लाह कडेच धाव घ्यावी. मानवाने ठाम विश्वास बाळगाला पाहिजे की संपुर्ण जग एकत्र मिळुन सुद्धा तुम्हाला फायदा पोहचवु शकत नाही, जोपर्यंत अल्लाह ची ईच्छा नसेल, आणी संपुर्ण जग एकत्र मिळुन तुम्हाला नुकसान पोहोचवु शकत नाही, जोपर्यंत अल्लाह ची मर्जी नसेल, अर्थात संपुर्ण जग एकत्र मिळुन सुद्धा तुम्हाला नुकसान पोहोचवु शकत नाही, जोपर्यंत अल्लाह ने तुमच्या नशिबात लिहुन ठेवले नसेल, जे नशीबाची लिहिले असेल ते घडणारच. जो व्यक्ती अल्लाहची जपणूक करतो, म्हणजे त्याच्या आज्ञांचे पालन करतो, आणि त्याच्या मनाई केलेल्या गोष्टींपासून दूर राहतो, अल्लाह त्याच्या पुढे असतो, त्याची अवस्था जाणतो, त्याला मदत करतो आणि त्याला आधार देतो, जो मनुष्य आनंदावेळी अल्लाह चे स्मरण करतो, अल्लाह त्याची संकटावेळी याद राखतो, मग त्यावर रहमत,मदत,व भलाई उतरवितो, आणि प्रत्येक मनुष्य अल्लाहने त्याच्यासाठी ठरवलेल्या भले वाईटावर संतोष मानावा, संकटावेळी धिर धरावा, सब्र व संयम सोबत अल्लाह ची मदत उतरते,जेवढी संकटात वाढ होते, त्याच्या सोबत आसानी म्हणजे सहजता व भरभरता सुद्धा उतरते.