عَنْ حُذَيْفَةَ بْنِ اليَمَانِ رَضيَ اللهُ عنه:
أَنَّ النَّبِيَّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ كَانَ إِذَا أَرَادَ أَنْ يَنَامَ وَضَعَ يَدَهُ تَحْتَ رَأْسِهِ، ثُمَّ قَالَ: «اللَّهُمَّ قِنِي عَذَابَكَ يَوْمَ تَجْمَعُ أَوْ تَبْعَثُ عِبَادَكَ».
[صحيح] - [رواه الترمذي] - [سنن الترمذي: 3398]
المزيــد ...
हजरत हजाफा बिन यमाम (र.ए.) यांचे कथन:
जेव्हा पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) झोपण्याचा विचार करत असत तेव्हा ते आपले हात डोक्याखाली ठेवत असत आणि पुढील प्रार्थना म्हणत असत: "अल्लाहुम्मा किनी अज़बक यौमा तज्मा इबदक" (हे अल्लाह, ज्या दिवशी तू तुझ्या दासांना एकत्र करशील त्या दिवशी मला तुझ्या शिक्षेपासून वाचव).
[صحيح] - [رواه الترمذي - رواه النسائي - رواه أبو داود - رواه أحمد] - [سنن الترمذي - 3398]
जेव्हा पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) झोपायला जात असत तेव्हा ते आपला उजवा हात गालाखाली ठेवत असत आणि ही दुआ म्हणत असत: "अल्लाहुम्मा" हे माझ्या रब्ब! "किनी" मला "अजबक" तुझ्या शिक्षेपासून वाचव "यौमा तजमाऊ औ तब'असु इबादक" ज्या दिवशी तू तुझ्या सेवकांना एकत्र करशील किंवा उभे करशील, म्हणजेच न्यायाच्या दिवशी.