عَن هَانِئ مَوْلَى عُثْمَانَ رَضيَ اللهُ عنهُ قَالَ: كَانَ عُثْمَانُ إِذَا وَقَفَ عَلَى قَبْرٍ بَكَى حَتَّى يَبُلَّ لِحْيَتَهُ، فَقِيلَ لَهُ: تُذْكَرُ الْجَنَّةُ وَالنَّارُ فَلَا تَبْكِي، وَتَبْكِي مِنْ هَذَا؟ فَقَالَ: إِنَّ رَسُولَ اللهِ صلى الله عليه وسلم قَالَ:
«إِنَّ الْقَبْرَ أَوَّلُ مَنْزِلٍ مِنْ مَنَازِلِ الْآخِرَةِ، فَإِنْ نَجَا مِنْهُ فَمَا بَعْدَهُ أَيْسَرُ مِنْهُ، وَإِنْ لَمْ يَنْجُ مِنْهُ فَمَا بَعْدَهُ أَشَدُّ مِنْهُ».
[حسن] - [رواه الترمذي وابن ماجه] - [سنن الترمذي: 2308]
المزيــد ...
हानी, जो उस्मान रजिअल्लाहु अन्हु यांचे सेवक होते, ते सांगतात:
जेव्हा उस्मान रजिअल्लाहु अन्हु एखाद्या कबरीजवळ उभे राहत, तेव्हा इतके रडत की त्यांची दाढी ओलसर होई.
त्यांना विचारले गेले: “तुमच्या समोर जेव्हा जन्नत आणि जहन्नमचा उल्लेख होतो, तेव्हा तुम्ही रडत नाही, पण कबरीसमोर इतके का रडता?”
ते म्हणाले: “मी अल्लाहचे रसूल ﷺ यांना असं म्हणताना ऐकलं आहे —”
“कबर ही परलोकातील पहिली पायरी आहे, म्हणून जर एखाद्याला त्यातून वाचवले गेले, तर त्याच्या नंतरचे जे येते ते त्याच्यापेक्षा सोपे आहे आणि जर कोणी त्यातून सुटले नाही तर नंतर जे येते ते त्याहून अधिक गंभीर आहे. .”
[حسن] - [رواه الترمذي وابن ماجه] - [سنن الترمذي - 2308]
अमीरुल-मोमिनीन उस्मान बिन अफ्फान रजिअल्लाहु अन्हु जेव्हा एखाद्या कबरीजवळ उभे राहत, तेव्हा इतके रडत की त्यांच्या अश्रूंनी दाढी पूर्ण भिजत असे. त्यांना विचारले गेले: तुम्ही जन्नत आणि जहन्नमचा उल्लेख ऐकता, पण ना जन्नतीची ओढ वाटते म्हणून रडता, ना नरकाच्या भीतीने! पण कबरीसमोर मात्र रडता? ते म्हणाले: पैगंबर मुहम्मद ﷺ यांनी सांगितले आहे की, कबर ही परलोकातील पहिली थांबण्याची जागा आहे. जर मनुष्य त्यातून सुरक्षित आणि मुक्त झाला, तर त्यानंतरची सर्व ठिकाणे त्याच्यासाठी सोपी असतील. पण जर तो कबरीच्या शिक्षेतून वाचला नाही, तर त्यानंतरचा प्रत्येक टप्पा त्याहून अधिक कठीण आणि भयंकर असेल.