عَنْ عَائِشَةَ أُمِّ المُؤْمِنين رَضيَ اللهُ عنها قَالَتْ:
كَانَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَسْتَفْتِحُ الصَّلَاةَ بِالتَّكْبِيرِ، وَالقِرَاءَةِ، بِـ الحَمْدُ لِلَّهِ رَبِّ العَالَمِينَ، وَكَانَ إِذَا رَكَعَ لَمْ يُشْخِصْ رَأْسَهُ وَلَمْ يُصَوِّبْهُ، وَلَكِنْ بَيْنَ ذَلِكَ، وَكَانَ إِذَا رَفَعَ رَأْسَهُ مِنَ الرُّكُوعِ لَمْ يَسْجُدْ حَتَّى يَسْتَوِيَ قَائِمًا، وَكَانَ إِذَا رَفَعَ رَأْسَهُ مِنَ السَّجْدَةِ لَمْ يَسْجُدْ حَتَّى يَسْتَوِيَ جَالِسًا، وَكَانَ يَقُولُ فِي كُلِّ رَكْعَتَيْنِ التَّحِيَّةَ، وَكَانَ يَفْرِشُ رِجْلَهُ اليُسْرَى وَيَنْصِبُ رِجْلَهُ اليُمْنَى، وَكَانَ يَنْهَى عَنْ عُقْبَةِ الشَّيْطَانِ، وَيَنْهَى أَنْ يَفْتَرِشَ الرَّجُلُ ذِرَاعَيْهِ افْتِرَاشَ السَّبُعِ، وَكَانَ يَخْتِمُ الصَّلَاةَ بِالتَّسْلِيمِ.
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم: 498]
المزيــد ...
मा आईशा अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की:
प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर नमाज ची सुरुवात तकबिर ए तहरिमा अर्थात अल्लाहु अकबरच्या घोषाने करत असत, आणी किराअत चा शब्दशःप्रारंभ कुरआन च्या पठणाने अलहम्दुलील्लाही रब्बिल आलमीन या सुरह ने करत होते,
जेव्हा प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर रुकु म्हणजे वाकुन अल्लाह ची स्तुतीगाण करत तेव्हा आपले डोके खुप वर किंवा खुप खाली करत नव्हते तर मध्यंतरी ठेवत असत,
रुकु मधुन उठल्यावर तोपर्यंत जमीनीवर नतमस्तक होत नव्हते, जोपर्यंत पुर्णतःताट व सरळ उभे राहत नव्हते,
तद्नंतर सज्दातुन डोकं उचलल्यावर दुसरा सज्दा तोपर्यंत करत नव्हते जोपर्यंत पुर्णतः बसत नव्हते,
प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर दर दोन रकाअत नंतर तशहुद (ज्यामध्ये अल्लाह ची प्रशंसा व प्रेषितांवर द्रुपद व सलाम चे पठण करत)
प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आपल्या डाव्या पायाला आथरुन त्यावर बसत होते व उजवा पाय ताट जमीनीवर गाडुन उभा ठेवत होते,
आणी प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर शैतान सारखे बसण्यास मनाई करत होते,
सज्दा [नतमस्तक] अवस्थेत आपले दोन्ही हाताची बाजु जमीनीवर आथरणे जसे हिंसक प्राणी आथरतात याला प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर मनाई केली,
तसेच प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर नमाज चा शेवट सलाम ने करत होते.
[صحيح] - [رواه مسلم] - [صحيح مسلم - 498]
श्रद्धावंताची आई मा आईशा अल्लाह राजी असो त्यांच्याशी प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर नमाज चे सविस्तर वर्णन करतांना सांगतात की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आपल्या नमाज ची सुरुवात तकबिर ए तहरिमा द्वारा करत, म्हणजे अल्लाहु अकबर म्हणत, तसेच किराअत कुरआन पठणाची सुरुवात सुरह फातीहा ने करत होते <<अलहम्दुलील्लाही रब्बिल आलमीन... >>. नंतर जेव्हा प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर कयाम नंतर रुकु मध्ये प्रवेश करत असत तेव्हा डोकं वर ना खाली झुकवत बल्की सरळ व दरम्यान अवस्थेत ठेवत, आणी जेव्हा रुकु मधुन आपली मान उचलत तेव्हा पुर्णतःसरळ उभे राहत असत, व नंतर सज्दा करता झुकत होते, आणी जेव्हा पहिला सज्दा पुर्ण करत होते तेव्हा तोपर्यंत दुसरा सज्दा मध्ये दाखल होत नव्हते जोपर्यंत पुर्णतःथांबत नव्हते. प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर दर दोन रकाअत नंतर बसुन तशहुद म्हणत असत: <<अत्ताहिय्यातु लिल्लाही वस्सलवातु व तय्यबातु... >>, आणी दोन सज्दा दरम्यान व तशहुद मध्ये बसत तेव्हा आपला डावा पाय आथरुन त्यावर बसत होते, व उजवा पाय उभा ठेवत. आणी प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर शैतान सारखे बसण्यास मनाई करत होते, उदाहरणार्थ एकतर मनुष्य आपले दोन्ही पाय जमीनीवर आथरुण पायाच्या टाका वर बसतो, किंवा तो आपले नितंब जमिनीला लावतो, पाय सरळ पसरतो आणि हात जमिनीवर ठेवतो, जसे कुत्रा पसरून पडतो, तसेच सज्दा च्या अवस्थेत आपली बाजु जमीनीवर चिटकवण्यास मनाई केली, जी हिस्त्रक प्राण्यांची सवय आहे. प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आपल्या नमाज चा शेवट सलाम द्वारा करत होते, <<अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह>> उजवी कडे एकदा व डावीकडे एकदा.