عَنْ أَبِي هُرَيْرَةَ رَضيَ اللهُ عنه:
أَنَّهُ لَقِيَهُ النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ فِي طَرِيقٍ مِنْ طُرُقِ الْمَدِينَةِ وَهُوَ جُنُبٌ، فَانْسَلَّ فَذَهَبَ فَاغْتَسَلَ، فَتَفَقَّدَهُ النَّبِيُّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ، فَلَمَّا جَاءَهُ قَالَ: «أَيْنَ كُنْتَ يَا أَبَا هُرَيْرَةَ؟» قَالَ: يَا رَسُولَ اللهِ، لَقِيتَنِي وَأَنَا جُنُبٌ فَكَرِهْتُ أَنْ أُجَالِسَكَ حَتَّى أَغْتَسِلَ، فَقَالَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ: «سُبْحَانَ اللهِ، إِنَّ الْمُؤْمِنَ لَا يَنْجُسُ».
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم: 371]
المزيــد ...
अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु द्वारा नमुद आहे की:
एकदा मदिना च्या रस्त्यात त्यांची भेट प्रेषितांशी झाली, त्यावेळी ते स्वतःअशुद्ध अवस्थेत होते, अबुहुरैरा रजि, गुपचुप लवकर तिथुन पसार झाले,व गुस्ल [आंघोळ] करता परत आले, प्रेषितांनी विचारले,अबुहुरैरा कुठे गेले होते?
त्यावरअबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु उत्तरले की, मी अशुद्ध अवस्थेत होतो, व मला आवडले नाही , की मी तुमच्यासोबत अशुद्ध अवस्थेत वावरावे, प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले,पवित्र आहे,तो अल्लाह,ईमानधारक अपवित्र नसतो>>.
[صحيح] - [متفق عليه] - [صحيح مسلم - 371]
मदिन्याच्या एका रस्त्यावर नबी करिम यांची भेट अबू हुरैरा यांच्याशी झाली, त्या वेळी अबू हुरैरा जनाबत (अपवित्रता) स्थितीत होते, त्यांना असे वाटले की अशा अवस्थेत आपल्या सोबत बसणे किंवा संवाद साधणे योग्य नाही, त्यांना वाटले की ते अशुद्ध आहेत, म्हणून ते हळूच तेथून निघून गेले, घुस्ल (अंघोळ) केली आणि नंतर परत येऊन नबी समोर बसले. तेव्हा नबी यांनी त्यांना विचारले की ते कुठे गेले होते? यावर अबू हुरैरा रजिअल्लाहु अनहु यांनी आपली स्थिती सांगितली आणि म्हटले की ते जनाबत (अशुद्धता) स्थितीत असल्यामुळे रसूलचा समोर बसणे योग्य समजत नव्हते, हे ऐकून नबी करिम आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले: निश्चितच, मोमिन व्यक्ती पवित्र असते आणि कोणत्याही परिस्थितीत अपवित्र होत नाही; ना जिवंत असताना आणि ना मृत्यूनंतर.